मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं,
तुझं हसणं, तुझं दिसणं, सारं काही नवीनच,
तरीही या नव्याचा मला ध्यास जडे..!
मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम
तु म्हणावे चल निघुया अन् मी म्हणावे थांब,
दिवसभर चालू आपले हे खेळ वेडे..!
मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
दिवस असला सोबत तरीही,रात्र स्वप्नांची कधीना सरे
रात्रंदिवस संवाद आपुले, तरीही पडती हे क्षण अपुरे,
क्षण सोबतचे आठवी मन, अन् रमे त्यातचं वेडे..!