कविता

अनईझी.......!!

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
12 Jun 2015 - 8:58 am

कृष्ण उभा यमुना किनारी
होऊनी अनईझी,
गोपिका तिकडे मजेत
वाट्सप्प वरती बीझी...!!

दुध लोणी गायब झाले
फास्ट फुडचा जमाना,
गोपी खाती नुडल्स
भरती बर्गर चा बकाना...!!

पुर्वी एकच पेंद्या होता
आता सारेच पेंद्या झाले
मैदानी खेळ सोडूनी,
फेसबुक वरती आले...!!

गोधन झाले आऊट डेटेड
गोकुळात मॉल आले,
गोवर्धन विकला गुण्ठे वारी
मथुरा कॉस्मोपॉलिटन झाले .!!!

फ्री स्टाइलकविता

फक्त तू नाही आहेस..................

झंडुबाम's picture
झंडुबाम in जे न देखे रवी...
11 Jun 2015 - 11:28 pm

रोज सकाळी उठल्यावर
आरसा बघितला की जाणवतं
जे तुझ्या डोळ्यात दिसतं ते आरशात दिसत नाही
आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस

नंतर अंघोळ करताना दिसतात
शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच
मग पुन्हा पुन्हा कवितांची आवर्तनं
आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस

एकटा असताना तुझा गंध जाणवतो
खूप जवळ उभी आहेस वाटून जातं
पण एक जीवघेणी शांतता असते सगळीकडे
तुझा मोहक आवाज कुठेच नसतो
आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस

कविता

जन्म घेतला तेव्हाच....!!

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
11 Jun 2015 - 8:20 am

जन्म घेतला तेव्हाचं
खोदून कबर आलो
औपचार म्हणून
आयुष्य घालवीत होतो

आलो त्याच्या कडून
जायचे त्याच्याच पाशी
प्याला जीवनाचा
घोट घोट संपवित होतो

परत करावयाचा उसना
देहाचा अंगरखा हा
मिजाशीने त्याला
म्हणुन वागवीत होतो

पुरी होती करावयाची
कहाणी जिंदगी ची
आयुष्याची कोरी पाने
मी जगुनी भरवीत होतो

उभ्या आडव्या धाग्यातून
निसटणार शिताफिने
नाती स्नेहाची मी
वृथा गुंतवित होतो

होता सोडायचाच
मंच दुनियेचा
तोंड रंगुवुनी पात्र
मात्र वठवित होतो!!

भावकविताकविता

वाट

अनिल रामेश्वर लांडे's picture
अनिल रामेश्वर लांडे in जे न देखे रवी...
10 Jun 2015 - 2:43 pm

पुन्हा लागली जीवाला,
ओढ तुला टिपण्याची,
साक्ष देईल प्रेमाची,
भाषा ओल्या पापण्यांची.

नाही हा भाव मनाचा
द्वेष जरी हा डोळ्यांत,
वाट पाहतो दारात
पुन्हा घेण्यास घरात .

चुका विसरुनी साऱ्या
दुखं ठेवील पोटांत ,
मिरवीन चार-चौघात
गोड बोलुनी ओठांत.

फक्त विचारीन काय होती
चुक माझ्या मागण्यांची,
शिक्षा दिली एवढी
दिशा पांगण्यांची.

केले केव्हाच माफ सख्या
आता आहे तुझी पाळी,
फक्त वाट त्या क्षणाची
केव्हां चुकवशील हि उधारी.

@अनिल …

कविता

वडा पाव रे........!!!

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 6:22 pm

ती म्हणे : प्रत्येक जन्मी
हाच नवरा मिळावा
तो म्हणे : देवा ,
नविन चॉइस तरी कळावा.....!!

ती म्हणे : बरा असतो
एकच एक गडी
माहीत होऊन गेलेल्या
सार्या त्याच्या खोडी .....!!

तो म्हणे : चांगली असे
अंबाड्या ची भाजी
तरीही खावी वाटे
कधी तरी कांदाभजी ....!!

नाठाळाला वठणी वर
आणावयाचा त्रास
हरेक जन्मात वाचेल बाई
आमचा तो ख़ास....!!

ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!

फ्री स्टाइलकविता

पुन्हा एकदा दमामि म्हणे …

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 3:18 pm

चर्चा उगा कशाला? (मी) भलताच "शाय" आहे
विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे ….
कोणी म्हणे टका तर गिरिजा कुणास वाटे
समजे सगाच कोणी, सूडात पाय आहे …
चिमण्यास येई शंका, कोठून धूर येतो
मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे…
आत्मुस फक्त पडली चिंता दहा दिसांची
जेपी करून गेला टेम्पोत "बाय" आहे….
नियमात नाही त्यांच्या तरी लावतात फास
डुआयडिंवरी हा उलटाच न्याय आहे ….
चुकलात यार तुम्ही , अंदाज फार झाले
पूर्वी कधी न झाला (मी ) अज्ञात "भाय" आहे …

अभय-गझलकविता

जगावेगळे... !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 10:50 am

जगावेगळे मागणे मागतो मी
तुझी याद नाही विसर मागतो मी

स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही
तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी

नको शाश्वती जीवनाची दयाळा
हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी

किती आजवर मीच केलीत पापे
नको श्वास आता, अभय मागतो मी

इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे
जमावे मला वाकणे.., मागतो मी

नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची
'हरामीपणा' थोडका मागतो मी

जगाला कळेना विनंत्या मनाच्या
विषाचाच जहरीपणा मागतो मी

कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'?
जगावेगळ्या मागण्या मागतो मी !

विशाल..

करुणकविता

ती आणि मी

गरजू पाटिल.'s picture
गरजू पाटिल. in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 7:57 am

(हे अगदी असं असायचं, म्हणून तसंच कवितेत लिहायचा प्रयत्न केलाय. ह्या सप्त्यातलं माझं भविष्य वाचलेलं असून देखील)

तिच्या नी माझ्या एकच वाटा,
फरक इतकाच...
मी जायचा त्या वाटेने आणि ती यायची... आमच्या दिशा वेगळ्या होत्या.

तिचे नी माझे थांबे ही एकच,
फरक इतकाच...
मी उतारु व्हायचो जिथे तिथेच ती चढायची...
आमच्या वेळाही वेगळ्या होत्या.

तिच्या नी माझ्या आवडी-निवडी ही सारख्याच,
फरक इतकाच...
मला काय आवडतं हे तिला जाणवायचं अनं तिला काय हवं ते मला.

कविता

प्रेम

Hrushikesh Marathe's picture
Hrushikesh Marathe in जे न देखे रवी...
6 Jun 2015 - 1:55 pm

तुझा हात माझ्या हाती,
शब्द फिके अशा एकांती,
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती...

किनारा असा फेसाळलेला,
आसमंत सारा गंधाळलेला,
बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा
तुझ्याच डोळ्यांत सामावलेला...

होई अचानक तुझा स्पर्श वेडा,
हर्षीलाच जाई जीव हा बापडा,
चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की
बने राजवर्खी हा ऋतू कोरडा...

किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी,
हिंडो कुठेही, विसावा किनारी,
असला दुरावा जरा काळ तरीही,
प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी...
- हृषीकेश

कविता

तुझं प्रेम

ganeshpavale's picture
ganeshpavale in जे न देखे रवी...
5 Jun 2015 - 10:26 am

तुझं प्रेम

कित्येक मैलाचा प्रवास केल्यावर
मिळालेला विसावा म्हणजे तुझं प्रेम

अथांग सागर पोहून पार केल्यानंतर
मिळालेला किनारा म्हणजे तुझं प्रेम

आयुष्याच्या खडतर प्रवासात
लाभलेलं सुख म्हणजे तुझं प्रेम

अपार कष्टानंतर सुखाची ओंजळ भरून
मिळालेलं फळ म्हणजे तुझं प्रेम

सुखादुखाच्या असह्य वेदनेनंतर
क्षमलेली कळ म्हणजे तुझं प्रेम

मायेचा ओलावा.. ममतेचा पाझर
जीवनभराचा गारवा म्हणजे तू प्रेम

कवि - गणेश पावलेकविता