मग कळेल मझा...!
तू काही माझं ऐकणार नाहीस
मीही आपला हट्ट सोडणार नाही...
तू घरात बसून....
बायकोच्या हातची भजी खात,
समाजातल्या विकृतींवर बोलणार...
वातानुकुलीत सभांमध्ये भाषणे ठोकणार
जमलंच तर झणझणीत कविता पाडणार
मला नाहीच रे जमणार...
तुझं हे तळ्यात - मळ्यात खेळायला
आत एक अन बाहेर एक जमवायला
आपलं कसं सारं एकदम सडेतोड असणार
आम्ही प्रत्येक प्रसंगाला थेट शिंगावर घेणार