तू काही माझं ऐकणार नाहीस
मीही आपला हट्ट सोडणार नाही...
तू घरात बसून....
बायकोच्या हातची भजी खात,
समाजातल्या विकृतींवर बोलणार...
वातानुकुलीत सभांमध्ये भाषणे ठोकणार
जमलंच तर झणझणीत कविता पाडणार
मला नाहीच रे जमणार...
तुझं हे तळ्यात - मळ्यात खेळायला
आत एक अन बाहेर एक जमवायला
आपलं कसं सारं एकदम सडेतोड असणार
आम्ही प्रत्येक प्रसंगाला थेट शिंगावर घेणार
नाही रे जमत मला असं जगणं
हे असं..., कौलातून झिरपणार्या..
थेंबभर कवडशांच्या मागे धावणं...
केव्हातरी उंबरठ्याबाहेर पाऊल टाक
चटके देणारं लखलखीत उन्ह अंगावर घे...
मग कळेल मझा...
बेभान होवून जगण्यातला
'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला !
विशाल
प्रतिक्रिया
13 May 2015 - 2:21 pm | वेल्लाभट
तुम्ही सुरेश वाडकरांचे फ्यान आहात का?
13 May 2015 - 3:12 pm | विशाल कुलकर्णी
तुम्ही सुरेश वाडकरांचे फ्यान आहात का?
फ्यान नाही म्हणता येणार. पण त्यांची 'चप्पा चप्पा' सारखी गाणी आवडतात ;)13 May 2015 - 3:17 pm | विशाल कुलकर्णी
रच्च्याक त्या 'मझा' साठी विचारताय का? तर नाही. हा शब्द आमचे आंतरजालीय कवि मित्र गिरीश कुळकर्णी नेहमी वापरायचे. ते नागपूरकर आहेत. त्यांची 'मझा' या शब्दाचा उच्चार करण्याची पद्धत मला जाम आवडते. त्यांच्यापासून हा 'शब्द' उचललाय. इथे 'ती' मजा नाहीये, तर 'तो' मझा आहे ;)
13 May 2015 - 5:59 pm | वेल्लाभट
हो मझा करताच म्हणत होतो. :)
13 May 2015 - 4:57 pm | अत्रुप्त आत्मा
@मग कळेल मझा...
बेभान होवून जगण्यातला
'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला ! >> येकदम सहमत!
मस्स्स्स्स्स्त कडक कविता.
14 May 2015 - 10:47 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद गुर्जी _/\_
14 May 2015 - 12:05 pm | मदनबाण
छान... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व
Why on earth is Narendra Modi going to Mongolia?
Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China
Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li
India’s foreign policy must continue to move past the parochial
Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns
14 May 2015 - 12:05 pm | गणेशा
मस्त एकदम .. सहज ओघवती पण विचार करायला लावणारी कविता..
आवडली एकदम
14 May 2015 - 6:41 pm | पैसा
कल्पना आणि शब्दयोजना एकदम मस्त!
14 May 2015 - 6:41 pm | पैसा
कल्पना आणि शब्दयोजना एकदम मस्त!
14 May 2015 - 6:45 pm | प्रसाद गोडबोले
मझा नाही अला . :- \
>>>> श्या ह्यात काय मजा ??
15 May 2015 - 12:42 pm | विशाल कुलकर्णी
श्या ह्यात काय मजा ??
पंत, इथे 'मी'चा अर्थ 'स्वत्व' असा नसून 'अहं' असा वाचा, मग 'मी;ला विसरण्यातील 'मझा' लक्षात येइल. तो सहजासहजी विसरता येत नाही. कारण तो आपल्या व्यक्तीमत्वाचा एक मुलभूत घटक आहे. पण तो जर विसरता आला तर जे साधता येतं त्याला तोड नाही.
15 May 2015 - 12:42 pm | विशाल कुलकर्णी
मनःपूर्वक आभार मंडळी :)