कविता

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
20 Apr 2015 - 2:15 pm

माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

करुणकविताचारोळ्यासमाजजीवनमानभूगोल

गावाकडची जुनाट आज्जी .....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
19 Apr 2015 - 10:23 am

जुन्या वहीची कोरी पाने
खिन्न उदासी त्यांच्यावरती
हुशार अवखळ मुले आजची
होड्या का हो बनवत नाही

अंगणातली हळवी माती
वाट पाहुनी थकून गेली
इवले इवले पाय चिमुकले
इथे कधी का धावत नाही

सडा गुलाबी गोड फळांचा
बदाम आहे उभा कधीचा
मगज आतला शुभ्र बदामी
कुणा कधी का खुणवत नाही

आंब्याची ती डहाळ वेडी
कैर्‍यांच्या वजनाने झुकली
तिला वाटते तुटून जावे
एकाकीपण सोसत नाही

सुट्टी येते ....
संपून जाते.....
गावाकडची जुनाट आज्जी
उगा बिचारी वाट पहाते
.....वाट पहाते....

कवितामुक्तकराहणी

माझा स्वभाव

Rajvardhan's picture
Rajvardhan in जे न देखे रवी...
18 Apr 2015 - 7:35 am

भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज
न खेळ मोडणे माझा स्वभाव
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम
न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव
रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची
न दिवस मोजणे माझा स्वभाव
उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह
न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात
न आसू ढाळणे माझा स्वभाव
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
न ओठ शोधणे माझा स्वभाव
@@ मी मात्र@@ राजवर्धन

कविता

ठळक माझी मेहुणी....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
17 Apr 2015 - 10:58 am

ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या
स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या
गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या

कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी
वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी
गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी

लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो
मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो
आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो
:(:(:(:(:(:(:(:(:(:(

विराणीकविताराशी

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 9:41 am

पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र

श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.

(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)

तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.

आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

नाऱ्या नाऱ्या

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
16 Apr 2015 - 11:04 am

नाऱ्या नाऱ्या चल्लस खय?
मालवणाची माका इल्ली सय.

नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक?
गरज पडलीहा निल्या नित्याक.

नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला?
तुजे तोंडात शिरो पडो मेल्या.

नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला?
गप बस मारे , काम कर वायला.

अभय-काव्यधोरणइतिहासबालकथाकविता

वळ्ण

योगेश भालेकर's picture
योगेश भालेकर in जे न देखे रवी...
15 Apr 2015 - 1:41 pm

अनोळखी वळणावर माझं आणखी एक पाउल,
तू इथं नसतानाही इथंच असल्याची चाहूल,

प्रत्येक शब्दं शब्दं मला सगळं स्पष्ट आठवतंय,
तुझ्यामाझ्यातलं अंतर मला पुन्हा मागे पाठवतंय,

तसं बरंच काही सांगायचं होतं,राहून गेलं,
मनात साठलं ते, पावसासकट वाहून गेलं,

"तू कसा आहेस?",विचारताना तु़झी घालमेल कळ्लीच,
प्रश्न होते नवीन पण आपुलकी तुझी अगदी पहिलीच,

थंड पडले होते तुझे ते काळे डोळे,
ओठांवर हसु तरी शब्द थोडे ओले,

बघ तुला काही अजुनही आठवतंय का?
आठवणींच्या गाठोड्यात माझं काही सापडतंय का?

कविता

आज मी आहे

Rajvardhan's picture
Rajvardhan in जे न देखे रवी...
15 Apr 2015 - 11:43 am

आज मी आहे
त्या वळणावर उद्या तू असशील
झिरपत राहील झरा , उन्मळत राहतील उपळे,
तरीही तिथे पाणी शेंदायला कोणीच नसेल
ते तळे देखील आज विरक्त आयुष्य जगत असेल कारण
आज मी उभा तिथे _ उद्या तू असशील |
जुळतील धागे , मिळतील नातीगोती
बांधल्या जातील रेशीमगाठी
टाकली जातील बंधने संस्कृतीची
लादले जातील निर्बंध रूढी परंपरांचे
आपसूकच टाकले जातील नांगे
स्वतंत्र स्वभावाचे

कविता

असा मी तसा मी

Rajvardhan's picture
Rajvardhan in जे न देखे रवी...
15 Apr 2015 - 11:14 am

असा मी तसा मी
कधी असेन निर्मळ ब्रम्ह्कमळ
तर कधी गलिच्छ बोतरा
नदीकिनारी विसर्जित निर्माल्य मी
वा गौरीपुजनासाठी वाहिलेला फ़ुलोरा मी
नववधूने गृह्प्रवेश करताना ओलंडलेले माप मी
वा शॄंगारच्या परमोच्च क्षणांचा सर्वेसर्वा मी
असा मी तसा मी
अळवावरुन घसरणारा दवबिंदू मी
वा गवतातून हेलकावे घेणारे पर्णओहोळही मी
काटेरी झूडपातील आंबट बोर मी
वा काटेरी बाळसदार फ़ुलणारा एक सायाळ मी
असा मी तसा मी
तहानल्याची तृष्णा मी
जीविताचा प्राणवायू मी
देहाला शिरशीरी आणणारी एक मधाळ झूळूक मी
वा वाऱ्याचे झंझावते नृत्य वादळ मी

कविता

दूर

योगेश भालेकर's picture
योगेश भालेकर in जे न देखे रवी...
14 Apr 2015 - 2:14 pm

जेव्हा तुझ्या आठवणीना मनामध्ये पूर येतो,
न जाणे कसा मी माझ्यापासूनही खूप दूर होतो,

फक्त वाहत वाहत जातो मी,
स्वतःच्या असण्यापलीकडे,
तुझ्या नसण्यापर्यत,
वेचत राहतो क्षण तुझे,
भिरभिरत राहतो इकडे तिकडे,
आठवणीचा पाउस असेपर्यत,

जेव्हा तुझ्या मिठीत असता जीव कासावीस भरपूर होतो,
तुझ्या निसटत्या हाताला पाहताना भरून उर येतो,

फक्त शोधत राहयचे तुला मी,
कुठे अनोळ्खी चेहर्यामध्ये,
स्वतःला तुझी ओळ्ख पटेपर्यत,
बेचेन होणं कधी कधी,
एकटं वाटून स्वतःला स्वतःमध्ये,
तुझ्या असण्यापासून तुझ्या नसण्यापर्यत,

कविता