कविता

मृगजळ...

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
14 Mar 2015 - 6:49 am

दूरदेशी फिरताना जेव्हा नवलाईची हौस फिटलेली असते
कर्तृत्वाच्या अश्व्मेधावर पळताना घरचे अंगण दूरावलेले असते
कमावले काय,गमावले काय आयुष्याचे सगळे गणितच चुकलेले असते
तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते

इथल्या माझ्या राजवाड्यात आता माझ्याशिवाय कुणीच बोलत नाही
उशिरा उठल्याबद्दलचा आईचा ओरडा आता दूरुनही ऐकू येत नाही
मिळवलेल्या यशाबद्दलची बाबांची शाबासकी आता पाठीवर पडत नसते
तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते

कविता

तरीसुद्धा ...

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
13 Mar 2015 - 5:52 pm

सारं तसं ठीक आहे संथ जीवन चालले आहे
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
दूर तू गेलीस त्याला एक तप उलटून गेले
पाण्यासारखे क्षण सुद्धा इकडे तिकडे वहात गेले
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
लग्न संसार मुलं-बाळं दोघं गुंतून गेलो आहोत
रुळलेल्या वाटेवरुन खड्डे टाळत चालत आहोत
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
मेघ कधी बरसत नाही , दूर ही निघून जात नाही
सावली देणं टाळत नाही, साथ देणं विसरत नाही

कविता

मत्कविता चालली ही!

पदकि's picture
पदकि in जे न देखे रवी...
12 Mar 2015 - 11:57 pm

मनवनात पातलीस..
मन्मनात मधुगडबड
मन्मानस-हंसिनीस
हृत्कोमल मधुबडबड!
(मत्कविता चालते ही
आगगाडी जर धडधड
मद्रसिका का करिसि
व्यर्थ अशी ती रडरड ?
)
: मिलिंद पदकी

काहीच्या काही कविताकविता

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
12 Mar 2015 - 3:13 pm

आळस देत मान वर काढता आली असती
जग म्हणजे काय ते बघता आलं असतं
हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं
कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ||

पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या
गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या
धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर
क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या
कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१||

शांतरसकविता

मि ही निळा रंग निळा,रंगांच्या बहुत कळा

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
11 Mar 2015 - 12:06 pm

मी ही निळा रंग निळा रंगांच्या जातं कुळा
स्वयमेवा-रंग कधी खेळलो न मि ही खुळा

स्वप्नांचा रंग नवा दिसवे तो बहु बरवा
रंगुनीही जाइ त्यात दिसला तो आत्म खुळा

रंगांचे देश नवे काय त्यात दिसत हवे?
तो हिरवा हा पिवळा त्यातचि मी एक निळा

रंगांनी काय दिले ? दालन ते बहुत खुले
शिरूनी मग आत त्यात हो तू ही बहुत-बळा

त्या गावी एकटाच नसतो कुणि सावळाच
असला जरी कुणिही तसा तो असतो बहु विरळा

रंगांची पंचमीच असते ती नित्य नवी
त्यात दिवस-जोडताच असते ती बहुत हवी
परी त्याच्या पाठून तू पाहि काहि दिव्य कळा

शांतरसकविता

तुम्ही अनावर व्हा....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
10 Mar 2015 - 8:51 pm

रणरणत्या दुपारी एक पक्षी सिमेंटच्या गॅलरीत आला.
तहानेने हा हा करीत होता.
‘ तहान तर संपत नाही.
सहन काहीच होत नाही.
उडू कसा, जगू कसा?
एक झाड सापडत नाही!’
मी म्हणाले, ‘रहा माझ्या घरात!’
काचेच्या तावदानावर चोच मारीत म्हणाला,
‘आमच्या बापजाद्यांनी ते ही केलं.
आरशांच्या मागे, दाराखिडक्यांच्या वर,
अगदी तुमचे संडासबाथरूम ही सहन केले.
आता, घरांनाही तेवढे उबदार कोपरे राहिले नाहीत.’
कोरडे डोळे पाणावत जराशाने म्हणाला,
‘भर दुपारी, निष्पर्ण वृक्षावर
अंडी घालायची हिम्मत आता होत नाही.

करुणकविता

उंच भरारी घे पाखरा

shrivallabh Panchpor's picture
shrivallabh Panchpor in जे न देखे रवी...
10 Mar 2015 - 7:01 pm

उंच भरारी घे पाखरा आकाशात
स्वप्नाच्या दाही दिशा तुजला बोलावतात
सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला
पंखात बल आणुनी आणखी उडाया

विसरलास जरी घरट्याला
तरी आठवण ठेव ममतेची
विसरलास जरी भूमीला
तरी आठवण ठेव मातीची

सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला
पंखात बल आणुनी आणखी उडाया

जाशील सुखाच्या वाटेवर
पण चालावे लागेल
आधी दुखाच्या काट्यांवर.
दिसतील अनेक मृगजळ
पण भुलू नकोस त्यांना

सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला
पंखात बल आणुनी आणखी उडाया

कविता

एके दिवशी

shrivallabh Panchpor's picture
shrivallabh Panchpor in जे न देखे रवी...
10 Mar 2015 - 6:25 pm

एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस

तुझ्या आणि माझ्या मैत्रीची चाले सर्वत्र चर्चा
तुझ्या चाहत्यांनी पण आणला घरी माझ्या मोर्चा
पण तू मात्र लग्नाचा आमंत्रण घेऊन आलीस

एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
तुझ्याकडे व्यक्त करायचं होत मला माझं प्रेम
पण तू "हो" म्हणशील याचा नव्हता नेम

माझी प्रेमाची भावना मनातच माझ्या विरून गेली

एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
पूर्वी इतकी "सुंदर" तू आजही दिसतेस

कविता

माहेरपण.....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
9 Mar 2015 - 11:26 am

जेव्हा दु:खच परतून येते
मायेने ते कवेत घ्यावे,
मालिश करुनी तळपायाला
हलके त्याला शांत करावे.

येणारच ते पुन्हा पुन्हा घरी
हक्कच त्याचा आपुलकीचा
सासुरवाशीण लेकीसाठी
माहेराने सज्ज रहावे.

कितीही आले ओठावर तरी
प्रश्न विचारू नये तयाला,
नशीब असते एकेकाचे
अपुले आपण मानून घ्यावे.

जाईल निघुनी उद्या सकाळी
नवीन क्षितिजे क्रांत कराया ,
करू नये पण उगीच त्रागा
तळहातावर दही वाढावे.

(लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)

कविता

आग

अवतार's picture
अवतार in जे न देखे रवी...
8 Mar 2015 - 9:35 pm

एकटाच बसलो होतो
सागरी किनारयावरती
आकाशी नक्षत्रांच्या
मिणमिणत्या अंधुक ज्योती

फेसाळत येई किनारी
चंद्राच्या ओढीने जी
प्रत्येक लाट ती माझ्या
अंत:करणातील होती

ठेचाळत जरी आली
नदी सागरास भेटाया
परी तिला मिळाली पहिली
ती साद कोणती होती

माझ्या कवितेची झाली
ही शुष्क कोरडी पाने
जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती

कविता