अंधार
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो
त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब
ना कसला डाग, ना कुठला बट्टा
सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ
.
जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते,
तिथे तो आपले हातपाय पसरतो..
मस्त राहतो..
.
तोच त्याला घेरुन राहतो
अन् तोच त्याच्यात भरुन राहतो
पण शांत शांत,
एकटा जरूर आहे पण एकाकी नाही
तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी
.
तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा
त्याला आमंत्रण नाही लागत
आगत स्वागत नाही लागत
तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा
तोच येतो तुमच्याकडे