कविता

नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 2:08 pm

नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..

.

शांतरसकविता

पाऊस आठवणींचा…

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 12:00 am

आज अचानक पाऊस आला,
सगळ्यांनाच भिजवून गेला…
एवढी कसली घाई होती बाबा,
हिवाळ्यातच पडून गेलास…

बरं येताना तू एकटा कधी येत नाहीस,
सोबत तिच्या आठवणीही घेऊन येतोस…

तू आपला पडून जातोस,
आणि मला मात्र कासाविस करतोस…

घरातच बसून मी बाहेर तुला पडताना पहात राहतो,
तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबात मला तिचाच चेहरा दिसत राहतो…

कधीतरी कडाडणाऱ्या विजेसोबत मी नक्षी आठवणींची विणत राहतो,
अश्याच कुठल्यातरी जुन्या पावसात मग मी देखील हरवून जातो…

कविता

हृदयाचा फोन

महेश अशोक खरे's picture
महेश अशोक खरे in जे न देखे रवी...
27 Jan 2015 - 1:55 pm

व्हॉटस् ऍपवर एक हिंदी मुक्तकाव्य आलं होतं. आवडलं. वाटलं, हे मराठीत असेल तर छान होईल.
म्हणून एक प्रयत्न केला.

मूळ मजकूर

भावकविताकविता

निंगे सासरी ...

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
27 Jan 2015 - 7:36 am

निंगे सासरी नवरी
मनी फाटलं अभाय
नोता निंगता निंगत
कसा घरातुनं पाय १
भिरं भिरं लानं भाऊ
फिरे तिचया पाठी मांगं
घळी घळी पुसे तिले
आजं कुठी जातं सांगं २
केला साजं शिनगारं
जशी लक्षमी नटली
जाता माय बापा जोळं
घऴी डोयाची फुटली ३
टाके दमनीतं पायं
डोया पाये घराकळे
फुलं पानं तोरनाचे
आता सोकाउनं गेले ४
उभी आंगनात मायं
हाती डाबलं कुकाचं
टाके खुरावरं पानी
डोयातलया आसवाचं ५

कविता

सामंत

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
22 Jan 2015 - 5:02 pm

'गांधी येडा होता रे'
सामंत नेहमी म्हणतो
आणि मग
फोडला पायजे...XXत दम...ईस्रायल...
असं कायकाय बोलत राहतो
दोन पेग चढवलेले असतील तर सामंत अध्यात्म, सेक्स, मायन संस्कृती, काश्मीर प्रश्न यावर पण बोलतो
'नेहरू एक्झॅक्टली कुठे चुकला' हे सांगतो मग तो.

कविता

(सोबती) सकारात्मक.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जे न देखे रवी...
22 Jan 2015 - 3:54 pm

सुचेता ह्यांची सोबती ही कविता वाचली आणि आवडलीही.
तसं पाहिलं तर काव्य करणं हा माझा प्रांत नव्हे. पण मधेच कधीतरी सुरसुरी येते. सुचेता ह्यांची 'सोबती' कविता वाचली आणि आलेल्या सुरसुर्‍या अवस्थेत एक कविता होऊन गेली.

तुम्हा सर्वांच्या आस्वादार्थ......

सुखाला अनंत सोबती जरी,
दु:खातही तुम्ही एकटे नसता,
मित्र असतो सोबतीला,
सगळेच कडेने पोहणारे नसतात.

ज्याचं त्याने सामोरं जावं,
प्राक्तनाला दोषी का धरावं?
जीद्द अशी बाळगावी,
दैवानेही समोर झुकावं.

कविता

दे दणादण

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
21 Jan 2015 - 6:04 am

बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण
परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण

प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण
समयसारणी हे निकट हे स्तरण

पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण
आकाशग मग कुंडल तंतु भारण

पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण
बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन

प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण
ग्राभित विदरण का विरुप निःशोण

रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण
संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण

विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन
वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन

कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण
अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

काहीच्या काही कविताभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसकविता

खोकल्या धाई दिशा

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
20 Jan 2015 - 8:49 am

सर्व मिपाकरांना साष्टांग दंडवत घालून मी हा प्रयत्न करत आहे . प्रेरणा नुकताच वर आलेला हा धागा
मोकलाया दाहि दिश्या
<निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे
निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो खोकले की मी अत्ता तन्दलित आहे
एकु द्या मज थनाना त्य्य बाबान्च्या तोन्दातुनी
झुरका मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति जी हात्भात्ती ढोसली
दोके डूखी होउअन भेतलि मज दिवसा ती भेतलि
काचेचया गलासतुन व्हिसकिची ही स्पन्दने

कविता

सोबती

सुचेता's picture
सुचेता in जे न देखे रवी...
18 Jan 2015 - 3:58 pm

सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात

ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं

हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं

शांतरसकविता

प्रश्न असा की......

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
17 Jan 2015 - 10:34 pm

प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे कधीच नसते सुचले उत्तर
प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे प्रश्नातच दडलेले उत्तर..

प्रश्न असा की मनात येता डोळे अलगद भरून यावे
दुखरे आणिक हळवे उत्तर अश्रूंमध्ये वाहून जावे..

प्रश्न असा की सात्विक, दाहक, तेजस्वी कृष्णेसम कणखर
प्रभेत त्या प्रश्नाच्या व्हावे द्रोण, भीष्म अन कृपही निरुत्तर..

प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा
सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा..

प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे
उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..

कविता