कविता

मन

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
5 Feb 2015 - 9:31 am

मन... मनाचे पाखरु
घाले गवसणी नभी
कधी बनुन कोकरु
दूर पळे रानोमाळी

मन विशाल सागर
कुशी घेई नदी नाले
मन सशाच्या दिलाचे
दडू बसे बिळामधे

मन कधी असे वारु
कधी प्रेमाचा सागरु
कधी मर्द त्याला म्हणु
कधी कलिकेचा वेणु

मन पियानोची धुन
मन मुरलिची तान
मन गंभीर आरोह
मन सतारीच गान

मन वेल हसणारी
मन नदी पळणारी
मन पर्वत शिखरी
मन पाताळही ढुंडी

मन... मनाची कविता
प्रत्येकाच्या मनि फुले
त्याच्या सुवासाच्या संगे
जीव प्रत्येकाचा डोले

कविता

विकावी म्हणतोय लुना…

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
4 Feb 2015 - 11:04 am

या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते .
सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_

खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना
जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना…

धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो
आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो …

ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी
पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी …

बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो?
निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो…

कवितामुक्तक

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
3 Feb 2015 - 2:40 am

गोवंशाला अभय द्या...!!

बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!

अभय-काव्यनागपुरी तडकाकविता

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 Feb 2015 - 12:11 pm

a

(पुस्तक-परिचय )

मांडणीवाङ्मयकवितासाहित्यिकआस्वादसंदर्भप्रतिभाविरंगुळा

म्हातारी ग मैना

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
1 Feb 2015 - 12:07 pm

लांब सडक केंसावरी
हात फिरविला तिने
विग खाली पडली.

दर्पणात छवी पाहुनी
जोरात ती हसली
कवळी खाली पडली.

उचलताना कवळी
चष्मा पडला खाली
दिसे केवळ अंधार.

म्हातारी ग मैना
कर भक्तीचा शृंगार
झाला फिका संसार.

कविता

मागे राहिली आवली ......

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
31 Jan 2015 - 11:48 am

तिच्या डोळ्यातली व्यथा , कुणी नाही रे जाणली
तुका वैकुंठासि गेले, मागे राहिली आवली

सावधान म्हणताच, पाशातून सुटलात
तुम्ही झालात समर्थ, ती गजाआड खोळंबली

तिची प्रीती तिची भक्ती, काळापार कान्ह्यासाठी
एका हाकेवर भोज ,त्याला मीरा ना लाभली

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
त्याचे घर भोगी पण, निजसूर्याची काहली

कविता

पिक्चरगाथा ('टॉरेंटगाथा'वरून प्रेरित)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Jan 2015 - 4:21 pm

संकेतानंदांच्या या कवितेवरून प्रेरणा घेत माझाही एक दुबळा प्रयत्न

सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी
इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी
लॅपटॉप मांडीवर ठेवून घरीच केले थेटर मी
डोळे फाडून बघत बैसलो वेडा एक निशाचर मी
पेनड्राईव्हे देणे घेणे करण्यामध्ये तत्पर मी
नवे सिनेमे आणिक सीझन जाणून घेण्या ईगर मी
हर वीकांती शुक्र शनीला बघावा नवा पिक्चर मी
असे घरगुती मनोरंजनाचे हे केले फीचर मी
सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी
इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी

काहीच्या काही कविताकविता

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Jan 2015 - 12:01 pm

आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली.

त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

पुरुषांची बाजू मांडण्याचा केलेला हा केविलवाणा खाटाटोप म्हणाना....

प्रत्येक नजर वाटे
गिळते मी तूज आता
लग्नाचे बंध होती
पुरुषाचे भोग आता ||धृ||

अभय-गझलआरोग्यदायी पाककृतीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनविराणीसांत्वनावीररसपाकक्रियाकविताउखाणेजीवनमानऔषधोपचारगुंतवणूककृष्णमुर्तीशिक्षण

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
30 Jan 2015 - 10:41 am

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!

अभय-काव्यनागपुरी तडकाकविता

स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 4:05 pm

प्रत्येक नजर वाटे
धरतेच डूख आता
स्त्रीजन्म हीच आहे
हर स्त्रीची चूक आता ||धृ||

हक्क कितीक आले
आरक्षणेही आली
आणि वेगळेपणाची
मग लक्षणेही आली
गर्दीत पुरुषांच्या
कोंडतो श्वास येथे
एकटेपणात होतो
भलताच भास येथे
शोधता स्नेह नयनी
दिसतेच भूक आता

कळपात श्वापदांच्या
गत होई जी हरणाची
होते तशी अवस्था
अन भीती ही मरणाची
एकही भला चेहरा
ना वाटतो आधार
सर्वांसमक्ष येथे
घडतोही अत्याचार
सगळा समाज वाटे
झालाय मूक आता

भावकविताकरुणकवितासमाज