पिक्चरगाथा ('टॉरेंटगाथा'वरून प्रेरित)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Jan 2015 - 4:21 pm

संकेतानंदांच्या या कवितेवरून प्रेरणा घेत माझाही एक दुबळा प्रयत्न

सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी
इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी
लॅपटॉप मांडीवर ठेवून घरीच केले थेटर मी
डोळे फाडून बघत बैसलो वेडा एक निशाचर मी
पेनड्राईव्हे देणे घेणे करण्यामध्ये तत्पर मी
नवे सिनेमे आणिक सीझन जाणून घेण्या ईगर मी
हर वीकांती शुक्र शनीला बघावा नवा पिक्चर मी
असे घरगुती मनोरंजनाचे हे केले फीचर मी
सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी
इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी

-अपूर्व ओक

डिस्क्लेमरः कवितेत व्यक्त झालेले शब्द, भाव व अर्थ काल्पनिक असून कवीच्या मानसिकतेशी, विचारांशी किंवा आचारांशी त्याचा एक बाईटभरही संबंध नाही.

काहीच्या काही कविताकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Jan 2015 - 10:17 pm | पैसा

आमी ब्वा पायरेटेड डीव्हीड्या आणतो. का म्हणता? सिनेमा तयार करताना सगळा काळा पैसाच तर वापरलेला अस्तो! ;)

विशाल कुलकर्णी's picture

31 Jan 2015 - 8:30 pm | विशाल कुलकर्णी

विडंबनापेक्षा 'ढुस्क्लेमर'जास्त आवडला ;)