"जेसन आणि बोलती बेडकी"
सिलिकॉनदरीत/वसे तो जेसन
शिका हा लेसन / तरुणींनो
त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त
संगणकी रक्त/ खेळतसे
रस्त्याने चालता / एका प्रात:काली
बेडकी बोलली / शेजारून
"अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही
बेडकाचे देही/ शापग्रस्त
मला उचलून / स्वगृही नेशील
आणिक घेशील / चुंबन ते
प्रगटेल माझे / मानवी शरीर
"कामा" स उशीर / मग नाही
जन्मभर तुझी/ होईन मी कांता
आनंदा अनंता/ मुकू नको "
जेसनने तिला / मग उचलले
आणिक ठेविले / खिशामाजी
घरामध्ये तिला / दिले छोटे घर
खायलाही चार / किडे बिडे