✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वैभवशाली वाडा जुना

प — प्रमोद देर्देकर, Wed, 02/11/2015 - 15:47
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना, ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं, गवताच्या पातीशी आता जडलंय नातं, दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं, अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं, कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य, असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं, डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं, आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न, कोणा एके काळी झडत असतील नौबती, अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती, आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल, तरीही, वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना.

प्रतिक्रिया द्या
3927 वाचन

💬 प्रतिसाद (9)

खूप छान.

प्रचेतस
Wed, 02/11/2015 - 16:20 नवीन
खूप छान. आवडली कविता.
आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न,
आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग व्हायची वाट पाहात ते दिवाभीतासारखं भिणं असा बदल सुचवतोय.
  • Log in or register to post comments

मस्त कविता.

एस
Wed, 02/11/2015 - 16:40 नवीन
मस्त कविता.
  • Log in or register to post comments

व्वा

टवाळ कार्टा
Wed, 02/11/2015 - 16:59 नवीन
व्वा :)
  • Log in or register to post comments

छान रचना.

सस्नेह
Wed, 02/11/2015 - 17:18 नवीन
भयाण वाडा वगैरे वाचून नारायण धारप आठवले.
  • Log in or register to post comments

आहा!

चुकलामाकला
Wed, 02/11/2015 - 17:18 नवीन
आवडली . पण एक शन्का , कोन्ग्रेसवर आधारीत आहे का? ;)
  • Log in or register to post comments

छान !

बबन ताम्बे
Wed, 02/11/2015 - 17:22 नवीन
तंतोतंत वर्णन! जुने किल्ले, वाडे पाहीले की असेच उदास वाटून जाते.
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/11/2015 - 17:45 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

उत्तम

पेशवा भट
Fri, 02/13/2015 - 18:59 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments

सुरेख !

मदनबाण
Sat, 02/14/2015 - 08:00 नवीन
सुरेख !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा