वैभवशाली वाडा जुना

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
11 Feb 2015 - 3:47 pm

वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा,
पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना,

ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं,
गवताच्या पातीशी आता जडलंय नातं,

दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं,
अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं,

कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य,
असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं

कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं,
डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं,

आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं,
मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न,

कोणा एके काळी झडत असतील नौबती,
अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती,

आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल,
तरीही,

वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा,
पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना.

काहीच्या काही कविताभयानकवावरइतिहासकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Feb 2015 - 4:20 pm | प्रचेतस

खूप छान.
आवडली कविता.

आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं,
मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न,

आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं,
मातीशी संग व्हायची वाट पाहात ते दिवाभीतासारखं भिणं

असा बदल सुचवतोय.

एस's picture

11 Feb 2015 - 4:40 pm | एस

मस्त कविता.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 4:59 pm | टवाळ कार्टा

व्वा :)

सस्नेह's picture

11 Feb 2015 - 5:18 pm | सस्नेह

भयाण वाडा वगैरे वाचून नारायण धारप आठवले.

चुकलामाकला's picture

11 Feb 2015 - 5:18 pm | चुकलामाकला

आवडली .
पण एक शन्का , कोन्ग्रेसवर आधारीत आहे का? ;)

बबन ताम्बे's picture

11 Feb 2015 - 5:22 pm | बबन ताम्बे

तंतोतंत वर्णन! जुने किल्ले, वाडे पाहीले की असेच उदास वाटून जाते.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2015 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

पेशवा भट's picture

13 Feb 2015 - 6:59 pm | पेशवा भट

उत्तम

मदनबाण's picture

14 Feb 2015 - 8:00 am | मदनबाण

सुरेख !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }