रूसली ही पोर ..
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी ..
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही