नक्षीची दुसरी बाजू..
नक्षीची दुसरी बाजू.
महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे.
त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!!
आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा
होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा
आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले
काया रापली जराशी, जरा गाल आत गेले