क. सांगता येत नाही

जातवेद's picture
जातवेद in जे न देखे रवी...
9 Feb 2015 - 9:04 pm

असो. आता या पुलाखालचं नुस्तं पाणिच काय
अख्खा पुल वाहून गेल्यात जमा झाला आहे
कदाचित कोरड्या प्रवाहामुळेपण पुल पडत असतो
अशा ह्या विचित्रपणाचा मी पहिल्यांदाच अनुभव घेतलाय
म्हणलं ठिकाय, आपण आता नविन पुल बांधुया

ठरलं तर. पण नविन पुल बांधायचा कुठे
जुन्या पुलाचा पाया तर काढता येत नाही
तसही इथे पाणि कुठाय? पुलाची गरजच नाही
चला मालक नविन पुलाची जागा शोधायला लागूया
पहिल्या एवढी नसेल पण सोईची मिळूनच जाईल

आपण मागच्या वेळच्या चुका परत नाही करायच्या
यावेळी एकेरी नको चांगला दुहेरी प्रशस्त बांधू
जुन्याची आठवण येणार नाही एवढा आकर्षक करू
उभारू त्या नव्या पुलावर नव्या प्रवाहाकडे पहात
आशा करू प्रवाहावरती असाच टिकून राहिल

चुकून जुनी जागा दिसलीच तर थांबू बघू
खाणाखुणा दिसतायत का कि ईथे पुल होता
असला नसला काय झालं जागा तशीच आहे
कपटं उगवली नसती तर वीटही दिसली असती
आता काय जागा अखत्यारित नाही व्हायचं ते होईल

उरला एक प्रश्न नविन पुलाच्या नावाचा
जुन्याचचं नाव देऊन नवा पुल म्हणावा का?
आता मी होय पण म्हणू शकत नाही
आणि नाही तर मुळीच म्हणता येणार नाही
माझं उत्तर आहे, क. सांगता येणार नाही

कविताजीवनमान

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Feb 2015 - 9:59 pm | पैसा

वेगळीच कविता! छान आहे.

चुकलामाकला's picture

10 Feb 2015 - 8:20 am | चुकलामाकला

पण क म्हणजे काय?

बहीरखेडकर's picture

10 Feb 2015 - 4:11 pm | बहीरखेडकर

अ. मी होय पण म्हणू शकत नाही
ब. नाही तर मुळीच म्हणता येणार नाही
क. सांगता येणार नाही

जातवेद's picture

10 Feb 2015 - 7:54 pm | जातवेद

नविन नात्याला काय नाव द्यावे सांगता येणार नाही.

स्पंदना's picture

10 Feb 2015 - 10:12 am | स्पंदना

फारच काही तरी वेगळ सांगतेय असं वाटलं ही कविता.
कुणी रसग्रहण करणार का?

सविता००१'s picture

10 Feb 2015 - 12:15 pm | सविता००१

पण मलाही कळलं नाही क म्हणजे काय?

चुकलामाकला's picture

10 Feb 2015 - 1:28 pm | चुकलामाकला

हा मला लागलेला अर्थ
प्रिय क
काय सांगू? आपल्या दोघांमध्ये बरच काही घडून गेलेय. त्यामुळे आपल्या दोघांना जोडणारं नातंच (पूल ) आता राहिलं नाही . आता बरच काही घडल्यामुळे नातं तुटलं की कोरडेपणामुळे. (भांडणामुळे की काही संवादच न उरल्यामुळे ?) ठीकाय . आता (दुसर्या कुणाशी तरी)नवीन नातं उभ करायला तर हवंच ना?
पण मन अजूनही जुन्यां नात्यात गुंतलय त्यामुळे इतक्या पटकन कुणी पसंतच पडत नाही . आणि पूर्वी इतकी मनाला उभारी सुद्धा राहिली नाही . पण रीतीसाठी, सोयीसाठी कुणीतरी शोधलंच पाहिजे . भले तुझी सर नसेल तिला … पण यावेळी मागच्या चुका टाळायला हव्यात . आधी मलाच तुझी ओढ होती (एकतर्फी प्रेम होते) आता दोघानाही एकमेकांची ओढ असू देत. इतकी की जुनं काssही आठवणार नाही . आणि आशा करू की ते नवं नातं मात्र छान टिकून राहील .
कधीतरी चुकून एकमेकांना भेटलोच तर… शोधू डोळ्यांमध्ये काही जुनी ओळख शिल्लक राहिलीय का? सगळं बदलंल तरी आपण दोघ तर तेच जुने असू ना? जरी आता एकमेकांचे राहिलो नाही तरीही? जे झालं ते नसतच घडलं तर कदाचित …. हो ना ?
आता प्रश्न आहे नाव काय देऊ या नव्या नात्याला? पुन्हा प्रेम म्हणू की अजून काही?काय उत्तर देऊ मी ? प्रिय क. मला नाही सांगता येणार …।
चु. भु द्या घ्या

जातवेद's picture

10 Feb 2015 - 7:52 pm | जातवेद

अगदी योग्य रसग्रहण आहे तुमचे! वाचून आनंद झाला.

स्पंदना's picture

11 Feb 2015 - 5:59 am | स्पंदना

धन्यवाद चुकलामाकला.
हं तुमच्या नावाचा शॉर्त्फऑर्म काय जमणार नाही ब्वा!! ;)

चुकलामाकला's picture

11 Feb 2015 - 1:43 pm | चुकलामाकला

ते फक्त माईच करु जाणे!:)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Feb 2015 - 9:19 am | अत्रुप्त आत्मा

तत्वज्ञान आहे,हवं तिथे लावता येइल..असं!

कविता आणि रसग्रहण दोन्ही जबरा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

चाणक्य's picture

11 Feb 2015 - 11:59 am | चाणक्य

आवडली. चुकलामाकला यांचे रसग्रहणही आवडले.

चुकलामाकला's picture

11 Feb 2015 - 1:42 pm | चुकलामाकला

धन्यवाद!

जातवेद's picture

13 Feb 2015 - 8:43 pm | जातवेद

सर्वांना धन्यवाद!