कविता

रक्तदाब!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
3 Jan 2015 - 9:21 am

एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब!

उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर!
आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) )

उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो.
पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) )

उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही!
पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही!

उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत..
पण हुच्चवाली..??? हास्पिटलात्,आय-सी-यूत ताटकळत रहातात.

आरोग्यदायी पाककृतीगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यअद्भुतरसकवितामुक्तकमौजमजा

अर्रे पांडुब्बा ..

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 1:33 pm

वर्जीनल कवी, लाडके मिपावासी स्पा आणि उल्लेखलेल्या समस्त मिपाकरांची मापी मागून

आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29893
---------------------------------------------------------------------------------

माताय, अंगातल्या टवाळकीमुळे खूप जिल्ब्यांसोबत मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.

टैम्पास करून घ्या मंडळी ... \m/

**************************************************

किती आठवणीने वाचावे तुझे लेख मी "ते" वाचून चित्त घाबरे अता
भुलवावे जगा किती पांडुब्बा कोणालातरी भान यावे अता

भयानकहास्यबिभत्सकविताविडंबनविनोदमौजमजा

अगा पांडुरंगा ..

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Jan 2015 - 12:07 pm

ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
गोड मानून घ्या मंडळी ... _/\_

**************************************************

किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता

नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्‍याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता

पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता

विठ्ठलशांतरसकविता

(सहज..)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
1 Jan 2015 - 7:55 pm

आत्मुदांची मापी मागून :)

पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887

------------------------------------------------------------------------

adagal

कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.

काहीच्या काही कविताभयानकहास्यबिभत्सकविताविडंबनविनोदमौजमजा

सुखसाधना

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
30 Dec 2014 - 10:08 am

मथुरा सुखी कान्हा सवे, त्याच्याविना इथे प्राण ना
गोकुळ रंगे त्याच्या सवे, त्याच्याविना मुळी त्राण ना ll १ ll

जादू करी मुरलितुनि फुलवी, चैतन्य कैसे सांग ना
मी घेतसा माझ्या करी, ती अबोल कैसी सांग ना ll २ ll

तू सावळा चितचोर रे, तू घननीळ जैसा श्रावणा
तू घे मला संगती, रंगात तुझिया मज रंग ना ll ३ ll

तू येतसा मन नादते, आल्हाद छाया या वना
तरु फुले अन पाखरे, धेनुही आतुर तव दर्शना ll ४ ll

तू सखा संगे तुझ्या, ये पूर्णता या जीवना
अगम्य साऱ्या लीला तुझ्या, एकवार अजुनी दाव ना ll ५ ll

कविता

कसं जमतं तुला

सुचेता's picture
सुचेता in जे न देखे रवी...
29 Dec 2014 - 8:30 pm

कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण

गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?

फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं

शांतरसकविता

निरंजनाची कविता

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
28 Dec 2014 - 8:18 pm

झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना |
शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद|
निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा ||

कविताप्रकटन

गंध माझे

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
26 Dec 2014 - 10:46 am

पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834
वर्जीनल कवीची मापी मागून :)

------------------------------------------------------------------------

ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे
गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll
अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी
अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll

या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा
ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll

काहीच्या काही कविताभयानकहास्यबिभत्सकविताविडंबनमौजमजा

गंध तुझे

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
26 Dec 2014 - 10:29 am

ये जरा भेटायला, घे ओंजळीतले फुल माझे
गंध सेवण्या तयाचा, काय सांग जाते तुझे ll १ ll

कळ्या पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी
मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll

या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा
तू अशी साथ असता, पौर्णिमेचा रंग सजे ll ३ ll

सखे ग सहवास तुझा, रंगतो निळया लाटांपरी
पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे ll ४ ll

- सार्थबोध
http://www.saarthbodh.com/2014/08/blog-post.html

कविता