कधी कधी
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी. विडंबन नाही, पण ज़हनसीब च्या चालीवर बसणारी ही कविता.
कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी
अजूनही
अजूनही
आठवते एक गाणे
कधी कधी धृ
कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या
मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या
धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या
तरी पुन्हा
तरी पुन्हा
उलगडतो तीच पाने
कधी कधी १