आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला
आधी शुभ्र वस्त्र धारण करावे
एक डिझाईनर झाडू आणावे
मग मिडीयाला बोलवावे
स्मायली फोटो चमकावे.
रस्त्यावरी कचरा पसरविला
तोची झाडून स्वच्छ केला
असा स्वच्छता अभियानाचा
नेत्यांनी बोऱ्या वाजविला.
प्रतिक्रिया
8 Nov 2014 - 7:45 pm | hitesh
पार्टी विथ डिफ्रन्स
8 Nov 2014 - 10:53 pm | खटपट्या
आवडली !!
9 Nov 2014 - 9:04 am | एस
कविता आवडली. मार्मिक आहे. पितळ उघडे पाडणारी.
9 Nov 2014 - 9:42 am | जेपी
ती आप वाली शाजिया ईल्मी घुसलीना पार्टित .
ये तो होना ही था
9 Nov 2014 - 3:03 pm | विवेकपटाईत
त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आणि शाजीया इल्मी पण होती. ही तर आपली सिम्बोलिक सफाई होती - स्पष्टीकारण
9 Nov 2014 - 11:13 am | विश्वजीत भोसले पाटील
स्वच्छता अभियानात भाजपने आधी कचरा केला, मग सफाई केली .मंदीर से पहले शौचालय' या मोदीजींच्या आगामी अभियानात भाजपेयी आधी परसाकडे जातील आणि मग बाजूने भिंती उभ्या करतील.
9 Nov 2014 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे
राजा, त्याचे माकड आणि माशी यांची कथा आठवली. हुशार शत्रू परवडला पण मूर्ख मित्र / नोकर नको !
9 Nov 2014 - 9:58 pm | अत्रुप्त आत्मा
हहा... :-D हहा... :-D हहा... :-D
भारीच!
11 Nov 2014 - 2:44 pm | अमोल केळकर
स्वच्छता अभियानाला , आले नेते
फटाक्याने करू स्वागत
तोच कचरा साफ करायला
मग वेळ नाही लागत
अमोल केळकर
मला इथे भेटा