दर्शनता!
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्याने रूपातुनं ती बोलावी.
सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.
विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.
कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही,
कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही!
काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे!
भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!!