कविता

प्रार्थना प्रिमियर लीग विजयाची

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
1 Sep 2014 - 2:10 pm

पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी.

गणपती बाप्पा काय काय सांगू
आलोय आम्ही मागायला
ते ते सगळं, जे जे लागतं,
प्रिमियर लीग मारायला ||धॄ||

कोच आहे विद्वान खरा
आहे जरा निराळी त-हा
मात्र सगळ्या प्लेयर्सना
शिकवा त्याचं ऐकायला ||१||

संघ टाकतोय कात जरी
नेहमीचीच ही बात जरी
नव्या जुन्याची सांगड तेवढी
मदत करा घालायला ||२||

बुद्धी पास द्यायला आणि
ताकद किक मारायला
जोर थोडा पायांमध्ये
बॉक्स टू बॉक्स धावायला ||३||

वीररसशांतरसकविताक्रीडा

सखे तुझ्या कवितेत...

अनाम's picture
अनाम in जे न देखे रवी...
30 Aug 2014 - 7:32 am

सखे,
तुझ्या कवितेत छान वर्णन असतं,
आभाळाचं, पावसाचं, गर्द झाडीचं,
पानाफुलांचं, भविष्याच्या स्वप्नाचं.
शब्दाशब्दातून पाऊस पडत असतो,
आणि दुर डोंगरावर रंगतही असतात,
शब्दांची रानंफुलं.

झाडांच्या पानाआड बसुन
जमीनीतून उमलणा-या रोपाशी खेळत
म्हणते-
उमलू दे रे तुझा जीव
फुलु दे तुझं मन,
झुरु दे रे हृदय,
साठवू दे तुला,
पानापानातुन निथळणा-या
चुकार थेंबांचा.. एक दीर्घ श्वास.

कविता

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

बीएमएम२०१५'s picture
बीएमएम२०१५ in जनातलं, मनातलं
28 Aug 2014 - 8:01 pm

BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे
अधिवेशन गीत स्पर्धा
हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे
गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

कलाकविताबातमीमाहिती

गोंधळ

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
26 Aug 2014 - 2:42 pm

सखे तू जवळ नसतांना
तुझे डोळे फार गोंधळ घालतात
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
------
गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र
आणि थंड पडलेल्या
इवलाश्या खिडकीतून दिसणारी
ती लोभस चंद्रकोर...
तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात
आणि मग फार गोंधळ होतो...
सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं
--------
सखे तू जवळ नसतांना
बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते
झरझर लेखणी शब्द पाझरते...
कविता तुझे वर्णन करायला लागते
तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते
मग तिचाच गोंधळ होतो, आणि

कविताप्रेमकाव्य

एकच तर जिंदगी हि...

मर्फी's picture
मर्फी in जे न देखे रवी...
25 Aug 2014 - 4:19 pm

एकच तर जिंदगी हि

बालपण मार खाण्यात गेल
जवानी अभ्यास करण्यात
अभ्यास करण्याच्या वयात प्रेम केलं
आन आयुष्य घातलं खड्ड्यात

म्हणतात आपलं भविष्य आपण ठरवतो
पण हे कोण सांगणार त्या गरीब मुलाला
कि त्यावर ९५ टक्के प्रभाव
घरात्ल्यांचाच असतो

स्वप्न बघायला मन उघडं असते
पण हे पण ऐका लोक्कांनो
त्या पक्षीच्या शेपटीला एक दोरी पण बांधलेली असते
आकाशाला जरी सीमा नसली तरी
आता तुमच्या स्वप्नांना सीमा असते

कविता

गुंफता कवन हे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
25 Aug 2014 - 3:04 pm

नमस्कार मंडळी,

एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे.

गुंफता कवन हे
उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल.

अभय-गझलमराठी गझलकवितागझल

अवशेची कविता बिविता....

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
24 Aug 2014 - 1:15 am

फेक प्रोफाइल्सच्या मागे दबल्या गेल्यात असंख्य भावना....
सुखाच्या महालात दडली आहे अस्वस्थ वेदना ..
मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा ...
कुणाला कळणार हा अंतरीचा मनोकंप ...
अशा बेफाम ,काळ्या रात्रीच प्रसवतात...
शोधत फिरावे जन्माची गुपिते..असंबंध फरफट....
मायेचे असंख्य धागे ....आयुष्याच्या वस्त्रात सापडावेत ....
काही क्षण काही धाग्यांनी बांधून दूर निघून गेलीत अनेक माणसे....
कोण कुठले अनामिक आहोत आपण....
एका अद्वैताने बांधलेले...

(अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.)

कविता

वारे जरासे गातील काही...

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
23 Aug 2014 - 8:07 pm

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही

म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही

घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही

संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही

दुःखे जगाची का रंगवू मी?
जगतो सुखाने त्यातील काही

सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे
मिळते जरी अंशातील काही

किंवा / आणि

वेसण कशाला घालू सुखाला?
मिळते किती? अंशातील काही

मराठी गझलकवितागझल

तुझ्या अंगणी

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
22 Aug 2014 - 10:15 am

तुझ्या अंगणी असेल बरसत
असाच पाउस अबोल, हळवा
टपटपत्या त्या थेंबांमधुनी
ऐकशील  तू मंद मारवा....

तुझे ही डोळे येतील भरुनी
मेघ जणु आकाशी आतुर
सांग कसे मग लपवशील तू
मनातले ते वेडे काहूर...

कुठे लपवशील माझे हसणे
कसे रोखशील माझे गाणे
डोळ्यामधले आसू लपवण्या
कितिक करशील खुळे बहाणे...

तुला सान्गतील जुन्या वेदना
आकाशातील मेघ सावळे
पुन्हा नव्याने रूजून येतील
आठवणींचे कोंब कोवळे......

कविता

अंगाई गीत

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
22 Aug 2014 - 2:01 am

लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला
बघ चोरपावलांनी चालून रात्र येई
निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही?

इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया
इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल
तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही
तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल

तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे
रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते
घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या
मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते

शांतरसकविता