सौंदर्यवती तू ......
असं गं रक्तिम मुख तुझं
जसं मिटल्या लाजाळूचं पान ,
त्यावर टेचात चालणं गं
वळवी वैराग्याची मान !!
मीच थिटा वर्णू कसा
सृष्टीत तूच महान,
सुरमयी कटी सखे
तुझा कुमुदिनीचा वाण !!
एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!
बेहोष गंध तुझा तो
त्यात रेखीव कमान,
बेसावध तुझ्यात तू मात्र
भुंग्यांना त्याची जाण !!
कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!