एकलव्य..

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जे न देखे रवी...
26 Jun 2014 - 10:35 am

एकलव्य....
कित्येक शतके उलटली
युगांतरे झाली
सत्तांतर घडले
मी माञ स्थिर आहे
त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत..
कोणी नाकारले म्हणूनच
शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच
मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले
मी धर्नुधर झालो
रक्ताळलेल्या चार बोटांचा
श्रेष्ठ शिष्यही झालो
तेव्हाच;
त्या हाताकडे पाहताना
दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर
पण;
मी डगमगलो ढासळलो
तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात?
तुमच्या सहानुभूतीच्या नजरात?
तुमच्या पाणावलेल्या इतिहासात?
तुमच्या या पराजित युगात...!

करुणवीररसशांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2014 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून वाचायला आवडतील कविता. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2014 - 11:32 am | प्रसाद गोडबोले

छान

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2014 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा

चांगला प्रयत्न आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2014 - 7:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हि झकास जमलीये....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2014 - 7:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हि झकास जमलीये....

धन्या's picture

26 Jun 2014 - 7:50 pm | धन्या

कविता आवडली!

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 8:03 pm | प्यारे१

आवडली.

सुधीर's picture

26 Jun 2014 - 11:02 pm | सुधीर

कविता आवडली!

पैसा's picture

27 Jun 2014 - 8:26 am | पैसा

अजून लिहा!

V SALES's picture

7 Jul 2014 - 3:15 am | V SALES

कवितानागेश's picture

7 Jul 2014 - 9:14 am | कवितानागेश

छान लिहिलिये कविता.

एस's picture

7 Jul 2014 - 10:32 am | एस

छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा:
माञ -> मात्र
निश्चिल -> निश्चल
धर्नुधर -> धनुर्धर
नजरात -> नजरांत

आयुर्हित's picture

7 Jul 2014 - 10:40 am | आयुर्हित

कोणी नाकारले म्हणूनच
शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच
मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले
मी धर्नुधर झालो

अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.