कविता

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
5 May 2014 - 3:34 pm

हलकेच सुरसुरी मग ..

प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते
प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते !

खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं
बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते

सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते
माझेच पैसे माझ्या खिशातून जाते !

संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी
नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते

डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली
हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते

ती अशीच येथे घाईत फार येते
पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते

काहीच्या काही कविताभूछत्रीहास्यकविताबालगीतविडंबन

इमारत

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
5 May 2014 - 12:27 pm

प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.

करुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

पाणी

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
4 May 2014 - 5:55 am

जलरुपी आसु गालावर ओघळले
नवजन्माचे सोहळे साजरे जाहले

कधी त्रुप्तीचे माध्यम बनले
अत्रुप्तीचे प्रतिक आसवातुन बनले

कधी उद्काच्या रुपाने हाती घेतले
नवसोबतीस नवआयुष्याचे साक्षीदार बनले

अखेर मडक्यातील पाणि बाहेर झेपावले
माझ्यासोबत तेही पंचतत्वात विलीन जाहले
-----------------------------------------------------------------------------------
टिप==
प्रतिक्रिया देताना हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घ्या अन्यथा एक भावी कवी इथेच मारला जाईल त्याचबरोबर माझ्या वयाचा विचार करुन सांभाळून घ्यावे

कविता

सये...

चिनार's picture
चिनार in जे न देखे रवी...
2 May 2014 - 5:40 pm

सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता.
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता ,
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता
तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

कविता

विसर

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
28 Apr 2014 - 12:39 am

भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव
आता तुला गाठायचा आहे तुझा गाव
आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा
आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा

तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ
तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ
विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या
हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या

हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ
हरवुदे वाट आडवळणी खट्याळ
खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा
तुला-मला जोडणारा तोड आता धागा

नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू
जायचीच निसटून हातातली वाळू

कविता

तू

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
27 Apr 2014 - 12:02 am

तू वादळी समुद्र
मी एक लाट छोटी
मिटते जरी तुझ्यात
येतेच नाव ओठी
    तू तेज:पुंज तारा
    रात्री नभात येसी
    मी एक रातराणी
     फुलले तुझ्याचसाठी
तू सूर्य अग्निगोल
मी शांत तृप्त धरती
फिरते यूगे यूगे का
वेडावुनी सभोती
    तू मेघ पावसळी
    झरसी असा तूफान
    मी एक वेल रानी 
     गाते तुझेच् गान
तू गंध पारिजात
मी लाजरी पहाट
येते तुझ्याचसाठी 
भेदूनी काळरात
 तू सावळा मुरारी
  निर्जीव बासरी मी
  देता तू श्वास हलके
   घेते तुझ्या लकेरी

शांतरसकविता

टग्यामहाराज बारामतीकर

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
23 Apr 2014 - 11:15 am

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
नष्ट करु पाहतो
मुतोनिया

विरोध करती
नतद्रष्ट काही
पण टग्यामहाराजांची
दृष्ट काढा

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला?

वाहते करी पाणी
बुच तोच मारी
शिव्या ओव्या मानी
तो सारख्या

अगस्त्याचा अवतार
टग्या बारामतीकर
त्याला वंदावे
पुन्हा पुन्हा

काहीच्या काही कविताहास्यकविता

पाऊस म्हणाला

मालविका's picture
मालविका in जे न देखे रवी...
22 Apr 2014 - 5:06 pm

पाऊस म्हणाला,
मी येतो नि धरतीला आनंद
मी येतो नि शेतकरी सुखावतो
मी येतो नि झाडं फुलं तरारतात
मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात

कविता

बघ जरा बघ जरा,

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
20 Apr 2014 - 4:54 pm

जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये,
खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये !

रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये
श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये !

फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ?
भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ?

मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ?
नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान

बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे,
बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !

कविता

तिला समुद्र आवडतो...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जे न देखे रवी...
19 Apr 2014 - 5:41 pm

तिला समुद्र आवडतो...

तिला पाऊसही आवडतो...

आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे

तिचा रूसवा कळतो त्याला

तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं...

पाठीवर स्पर्श जाणवला की

सुसाट सुटतो तो

काही बोलत नाही, विचारतही नाही

ती तिच्याच रूसव्यात दंग

एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र

ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली...

समुद्राच्या दिशेने धावलेली...

वळून त्याच्याकडे बघताना

भरून आलेलं आभाळ

अवचित आलेला पाऊस

आणि वाहून गेलेला रूसवा...

कविता