बघ जरा बघ जरा,

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
20 Apr 2014 - 4:54 pm

जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये,
खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये !

रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये
श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये !

फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ?
भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ?

मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ?
नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान

बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे,
बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Apr 2014 - 5:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रत्येक गोष्टीचे काळे आणि पांढरे असे विभाजन झालेच पाहिजे का?
पांढर्‍यांनी काळ्यांवर अन्याय केला असे सतत ओरडलेच पाहिजे का?
काळे खरोखर काळे असतात? आणि पांढरे खरोखरच पांढरे असतात का?
दांभिक पणाचे असले रंगीत चश्मे सदोदीत घातलेच पाहिजेत का?

चष्मा काढल्या शिवाय हे करड्या रंगाचे जग दिसणार नाही
मग मात्र माणुसकीच्या अणाभाका घ्यायची गरज उरणार नाही.

माहितगार's picture

20 Apr 2014 - 7:07 pm | माहितगार

चष्मा काढल्या शिवाय हे करड्या रंगाचे जग दिसणार नाही
मग मात्र माणुसकीच्या अणाभाका घ्यायची गरज उरणार नाही.

आणि या ओळी भावल्या

धन्यवाद

प्यारे१'s picture

20 Apr 2014 - 8:12 pm | प्यारे१

त्या अमिश का कोण त्याच्या 'शिवा-ट्रायोलॉजी ' मध्ये वाचलेलं! (पुस्तकं वाचली खरं. :( खोटं कशाला बोला?)

की ज्या रंगाची एखादी गोष्ट म्हणून आपण म्हणतो खरंतर त्याच रंगाचा स्पेक्ट्रम परावर्तित होऊन आपल्या डोळ्याच्या पटलांवर येऊन आदळलेला असतो. म्हणजे ती वस्तू त्या रंगाची नसतेच असं काही.... तरी.

कुणीतरी हुशार माणसानं नीट लिहा रे! ;)

पैसा's picture

20 Apr 2014 - 5:54 pm | पैसा

कविता पण लिहिता का? कविता आवडली.

माहितगार's picture

20 Apr 2014 - 7:25 pm | माहितगार

मिपावरील माझी पहिली कविता निवडणूकांबद्दल आहे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला Satire प्रकारात ललित अथवा काव्य क्वचीतच लिहितो असतो. मिपावरील माझी हि तशी दुसरी कविता

प्रतिसादासाठी धन्यवाद

प्रतिसादासाठी धन्यवाद.