इमारत

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
5 May 2014 - 12:27 pm

प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.

एक इमारत है
संग-ए-मर्मर मे तराशी हुई
चौधवी चांद जब महीन कोहरा लिपटकर आता है
तब मानो जन्नत की हूर लगती है वो इमारत
-----
सुना है के ये इमारत
किसी शाह ने अपने बेगम कि याद मे बनवायी है
हां... होगा कोई इश्क का मारा
-----
जब उसकी यांदे किसी आभिसारों की तरह
बरसती होंगी तो वो शाह
उस इमारत को देख के क्या सोचता होगा?
हां... इश्क का मारा जो ठहराँ
-----
फुतुर है ये मगर
कल रात फिर उसी महीन कोहरे मे
कई हाथोंको देखा था
उस इमारत के तआकुब में
कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे
और फिर रातभर वो
परछाईओंका खेल चलता रहा
------
आखिर चांद थक के
बुझ गया..
जब सुबह से कुछ पहले
उन हाथोंको अपने हाथ जोडकर
बक्षनेकी दुवा करता
वो शाह भी थक कर जाने लगा
तो उसकी आखोंमे कुछ जलते कतरे थे
उसके 'ताज' का एक मोती
गिर गया था...

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/०४/२०१४)

महीन= पातळ
आभिसार = धबधबा
फुतुर = वेडेपणा
तआकुब = अविरत पाठलाग
आदम = व्यक्ति

कोण्या काळची गोष्ट आहे, एक राजा अन् एक राणी
राणीच्या विरहात परंतू, राजाची स्वप्ने विराणी

एकाकी झुरतसे राजा, रात्र रात्र राणीला स्मरत
फर्मान सोडूनी घडविले त्याने, संगमरवरातले स्मारक

दिमाखात मग उभा राहिला, ताज नावाचा एक महाल
शुभ्र संगमरवरी ईमारत, चांदराती दिसे कमाल

काय तिचे सॊंदर्य वर्णू, अप्सरा न्हाहून यावी सचैल
चांदण्याने मग अंग टिपावे, रातीचे उरले प्रहर

काल रात्री परी महाली , काय आक्रीत पाहीले
छिन्नी हातोडा घेतलेले हात नुसते पाहिले

भास मनाचा होता का जे दृष्य खरे जे देखले
राजाचेही हात होते मागत काही मागणे

मावळतीला चंद्र जाता, राजा हताश चालला
चंद्र बांधता बांधता त्याने,डागही होता बांधला

|- चाण्यक -|
(०५/०५/२०१४)

करुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 May 2014 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली

प्रचेतस's picture

5 May 2014 - 12:59 pm | प्रचेतस

मूळ मिकाची हिंदी कविता आणि चाणक्याने केलेला अनुवाद दोन्हीही सुरेख.

अनुप ढेरे's picture

5 May 2014 - 1:19 pm | अनुप ढेरे

मस्तं. दोन्ही कविता आवडल्या.

मिकाची कविता 'पुन्हा' वाचली, 'पुन्हा' आवडली.

खूप खूप खूप सुंदर.

चाणक्य ह्यांचा भावानुवाद वेगळा लिहीला असता तर जास्त भावला असता.
(असं 'माझं' मत, अकारण सूड उगवू नये ;) )

पैसा's picture

6 May 2014 - 8:38 pm | पैसा

कविता आणि चाणक्याचा भावानुवाद दोन्ही आवडले. चाणक्याची कविता तर स्वतंत्रपणेही छान आहे.

शकील बदायुनीच्या

"एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल,
सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है"

आणि साहिरचं
"इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर
हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़"

यांची आठवण झाली.

चाणक्य's picture

11 May 2014 - 1:16 am | चाणक्य

वाह पैसा ताई. साहिरच्या 'ताजमहल' या नज्म मधल्या या ओळी. पूर्ण नज्म पण फार सुंदर आहे -

ताज तेरे लिये ईक मजहरे-उल्फतही (प्रेमाचे प्रतीक) सही
तुमको ईस वादी-ए-रंगींसे (रमणीय स्थळ) अकीदत (श्रद्धा) ही सही
मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे

अनगिनत लोगोंने दुनियामे मुहब्बत की है
कौन कहता है के सादिक (प्रामाणिक) न थे जजबे उनके
लेकिन उनके लिये तशहीरका (प्रसिद्धी) सामान नही
क्यों की वो लोग भी अपनीही तरह मुफलिस (गरीब) थे

मेरी महबूब ! उन्हे भी तो मुहब्बत होगी
जिनकी सन्नाईने (कारागिरी) बक्शी हैं इसे शक्ले-जमील (सौंदर्य)
उनके प्यारोंके मकाबिर (कबर) रहे बेनाम-ओ-नमूद (नामोनिशाण नाही कुठे)
आजतक उनपे जलायी नही किसीने कंदील

एक बादशाहने दौलत का सहारा लेकर
हम गरीबोंकी मुहब्बतका उडाया है मजाक
मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे

वाह क्या बात.

उर्दुवर इतकी जबरदस्त पकड मिका? स्पेशल्ली शिकलात की अशीच शिकत गेलात.
खर सांगु? मला त्यातले थोडे शब्द नाही समजले. अन मुळ कविता चाणक्यांमुळे समजली उमजली अन भिडली.
तुम्हा दोघांनाही सलाम!

मदनबाण's picture

7 May 2014 - 6:55 am | मदनबाण

मस्तच...

किसन शिंदे's picture

7 May 2014 - 8:57 am | किसन शिंदे

मुळ हिंदी-उर्दू कविता चेपूवर वाचली होतीच, आता इथे पुन्हा वाचली. दोन्ही एकदम ब्येष्ट!!

दोन्ही रचना उत्तम झाल्या आहेत. आवडल्या

यशोधरा's picture

11 May 2014 - 9:00 am | यशोधरा

सुरेख!

पाषाणभेद's picture

11 May 2014 - 9:43 am | पाषाणभेद

उर्दू कविता समजली नाही पण चाणक्याचा भावानुवादामुळे रचना समजायला सोपे झाले.
अवांतरः ताजमहाल ही वास्तू पाहिलेली नाही पण ती कधीच आवडली नाही. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2014 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण मला आवडली ती उर्दू रचना !

फुतुर है ये मगर
कल रात फिर उसी महीन कोहरे मे
कई हाथोंको देखा था
उस इमारत के तआकुब में
कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे
और फिर रातभर वो
परछाईओंका खेल चलता रहा

क्लास !!!

माझ्या एका मित्राची अशीच एक सुन्दर कविता आहे जमल्यास इथे डकवेन.

-दिलीप बिरुटे

ताजमहल.
नाही ती केवळ मुमताज आणि शहाजहानची समाधी
मला दिसताहेत हजारो कारागिरांचे छाटलेले हात प्रत्येक पायरीवर
ऐकूच येऊ नयेत आकाश किंकाळ्या शिल्पकारांच्या
म्हणूण आत बेमालूपणने चाललाय अल्लाचा गजर
आता टिकत नाही ताजमहलवर माझी नजर

ताजमहल _ अमानुष क्रौर्य
ताजमहल - छाटलेल्या हाताचं दीनवानं रूप
ताजमहल - आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल

विचारा, जवळून वाहणा-या यमुनेला ताजमहलचा काय इतिहास आहे ?
अन तिच्या पाण्याला अजूणही रक्ताचा का वास आहे ?
आपल्या शिल्पाची एवढी किंमत कधी कुणी चुकविली आहे ?

दोस्तहो,
ताजमहल दुसरं तिसरं काही नसून
माझ्या माणसांच्या पृथ्वीच्या पाठीवरील
गोठलेला अश्रू आहे !

(अनारंभ- राजेंद्र ना गोणारकर.)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 May 2014 - 11:27 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल

व्वाह!!

पाषाणभेद's picture

16 May 2014 - 8:56 am | पाषाणभेद

वा वा बिरूटे सर, एकदम मस्त!

चाणक्य's picture

19 May 2014 - 6:50 am | चाणक्य

असेच म्हणतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 May 2014 - 6:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

या इमारतीवर इतक्या कविता झाल्या आहेत की त्या सगळ्या एकत्र केल्या तर ठेवायला ती इमारत देखील अपुरी पडेल.