तिला समुद्र आवडतो...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जे न देखे रवी...
19 Apr 2014 - 5:41 pm

तिला समुद्र आवडतो...

तिला पाऊसही आवडतो...

आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे

तिचा रूसवा कळतो त्याला

तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं...

पाठीवर स्पर्श जाणवला की

सुसाट सुटतो तो

काही बोलत नाही, विचारतही नाही

ती तिच्याच रूसव्यात दंग

एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र

ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली...

समुद्राच्या दिशेने धावलेली...

वळून त्याच्याकडे बघताना

भरून आलेलं आभाळ

अवचित आलेला पाऊस

आणि वाहून गेलेला रूसवा...

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Apr 2014 - 8:17 pm | पैसा

एकदम रोमँटिक!

कंजूस's picture

19 Apr 2014 - 8:32 pm | कंजूस

???
!!!!
......

स्पंदना's picture

20 Apr 2014 - 8:59 am | स्पंदना

टु व्हिलर हाय जणु?

विवेकपटाईत's picture

20 Apr 2014 - 7:23 pm | विवेकपटाईत

अवचित आलेला पाऊस

आणि वाहून गेलेला रूसवा...मस्तच
विरहाग्नीत जळणाऱ्या धरतीची

माधुरी विनायक's picture

6 Jun 2014 - 1:25 pm | माधुरी विनायक

धन्यवाद...
सर्वांचे धन्यवाद...
अगदी बरोबर अपर्णा-अक्षय.. टू व्हीलरच...
आणि उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर.

भाते's picture

6 Jun 2014 - 8:13 pm | भाते

तुमच्या ब्लॉगवर ही कविता वाचली होती. कविता खरंच आवडली.
अगदी 'गारवा' ची आठवण झाली.