कविता

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
15 Apr 2014 - 3:23 pm

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं

तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं

आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं

आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं

कविता

तू

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
15 Apr 2014 - 11:10 am

कधी तुझी याद....संधीप्रकाशात
आणि मग खळबळ....कुठेतरी आत

चिंब जणू तू....चिंब पावसात
ओला ओला शहारा....चिंब शरीरात

उरी काहिली काहिली....जरी चांदरात
होई काळीज निखारा....तुझ्या विरहात

मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात
आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात

कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात
तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात

कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत
कधी माझी लाट....नेई तुला सागरात

दूर देशी तू....तरीही मनात
ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात

कविता

फैसला

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
12 Apr 2014 - 10:43 am

फैसला

जीवनाचा हाच साला घोर आहे
येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे

भामटा असणार हा नक्कीच नेता
ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे

खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता
हे कुणाचे माजलेले पोर आहे

मांडतो प्रस्ताव आता एकतेचा
कालचा तो हाच दंगेखोर आहे

मी निघालो आणि तू आलीस राणी
फैसला हा छान काटेकोर आहे

डॉ.सुनील अहिरराव

कविता

विलक्षण कविता - असाध्य वीणा

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
12 Apr 2014 - 8:31 am

"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली.
मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक!
___________

शांतरसकविता

आयुष्याचे सात वार

sunrise's picture
sunrise in जे न देखे रवी...
11 Apr 2014 - 5:15 pm

चंद्राचा शीतल प्रकाश, बाप्पा सगळ्यांना देतो
गोंडस बाळाच्या रुपात, प्रत्येकजण जन्माला येतो
बालपण कसे संपते, कधी कळतच नाही
असा सोमवार परत, कधी मिळतच नाही

मंगळाचा जोश, संपूर्ण तारुण्य व्यापतो
आभाळा एवढ्या आकांक्षा, आपण उरात जपतो
खूप काही करायला, वेळ कमी पडतो
आपल्या नकळत अचानक, बुधवार उजाडतो

बौद्धिक आणि आर्थिक, आपण झेप घेत असतो
कुटुंब, तब्येत, मित्र - ह्यांसाठी वेळच नसतो
अनुभवाचं लक्षण म्हणून जग, पांढऱ्या केसांकडे पाहतं
स्वतःसाठी थोडं जगायचय, असं मनात वाटत राहतं

कविता

छन्दोरचना

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
10 Apr 2014 - 10:40 pm

प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ १९३७ मध्ये छापून प्रसिद्ध झाला. (संदर्भ) या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे.

मराठी गझलकवितागझलतंत्र

निवडणुकीचा बिगुल . . .

संचित प्रमोद कुलकर्णी's picture
संचित प्रमोद कु... in जे न देखे रवी...
4 Apr 2014 - 4:06 pm

निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला
कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला

कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले
ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले

झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं
व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं

रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले
पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले

शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला
सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला

कविताराजकारण

रूमानी

अनाम's picture
अनाम in जे न देखे रवी...
4 Apr 2014 - 12:12 pm

देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात
अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा.
दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो
मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो.
सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.

भर दिवसा मला आभाळ भरलेले नसतांना
वीजा चमकल्याचा अन् गडगडाटांचा भास होतो,
कोणताच आवाज पोहचत नाही तुला

काठावर स्पर्श करुन परत फिरणारी तू
समुद्रलाटेसारखी  धडकत असते मला.

सृष्टीतले  चैतन्य समजून घेतांना
पा-याचा तो पारदेश्वरही समजून  घ्यावा लागतो.
एकाच खोडात वाढेला पिंपळ-लिंब अन
कुमारिकेचा भयान चेहरा मंत्र-तंत्र पुजा.

कविता

प्रीतीची पारंबी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
2 Apr 2014 - 10:18 pm

प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा
झिंगून पिंगा घाली 'अभय' येरझारा
ऊर्मीच्या उन्नतीने उमेदी उसळते ॥

अभय-काव्यवाङ्मयशेतीशांतरसकविता

मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
1 Apr 2014 - 11:43 am

भर्जरी दुःखात होतो नेहमी
मी तुझ्या कर्जात होतो नेहमी

शोधिसी आता मला दुनियेत या
मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

तू जरी केले न दिसल्यासारखे
मी तुझ्या लक्षात होतो नेहमी

आसवे उबदार तू मजला दिली
मी असा श्रीमंत होतो नेहमी !

तू जरी रस्ताच माझा सोडला
मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी !

मी जरी पापी न होतो फारसा
पण तिथे स्वर्गात होतो नेहमी

मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे
पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी

मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी
हातच्या रेषांत होतो नेहमी !

डॉ.सुनील अहिरराव

कविता