तू

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
15 Apr 2014 - 11:10 am

कधी तुझी याद....संधीप्रकाशात
आणि मग खळबळ....कुठेतरी आत

चिंब जणू तू....चिंब पावसात
ओला ओला शहारा....चिंब शरीरात

उरी काहिली काहिली....जरी चांदरात
होई काळीज निखारा....तुझ्या विरहात

मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात
आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात

कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात
तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात

कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत
कधी माझी लाट....नेई तुला सागरात

दूर देशी तू....तरीही मनात
ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात

कविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Apr 2014 - 11:15 am | यशोधरा

आवडली.

कवितानागेश's picture

15 Apr 2014 - 2:56 pm | कवितानागेश

छान आहे.

सार्थबोध's picture

15 Apr 2014 - 3:19 pm | सार्थबोध

छान आहे

मदनबाण's picture

15 Apr 2014 - 3:21 pm | मदनबाण

मस्त ! :)

मृगनयनी's picture

16 Apr 2014 - 7:37 pm | मृगनयनी

छान कविता!.. खूप दिवसांनी कुणाची तरी आठवण झाली!.. थॅन्क्स चाणक्य!

स्पंदना's picture

15 Apr 2014 - 3:37 pm | स्पंदना

फारच छान चाणक्य!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2014 - 5:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

शुचि's picture

15 Apr 2014 - 5:37 pm | शुचि

कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात
तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात

हे कडवे विशेषकरुन!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Apr 2014 - 6:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

दिलखुष..... :)

इन्दुसुता's picture

16 Apr 2014 - 9:10 am | इन्दुसुता

आवडली

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2014 - 9:16 am | चौथा कोनाडा

कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत
कधी माझी लाट....नेई तुला सागरात

या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना !

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 7:18 pm | प्यारे१

सुंदरच! आवडली.