कैफ़ियत..

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जे न देखे रवी...
24 Jun 2014 - 1:31 pm

कैफ़ियत..

प्रिये तु विचारतेस..
तु आज अस्वस्थ कसा?
तुझ्य़ा चेहरय़ावरचा भाव अस्थिर कसा?
भिजलेल्या ओल्या पापण्य़ा
मुद्रेवर विखुरलेल्या रेषा
काळाच्या चक्रात कैद नजर आणि
मनस्तापाने सोडलेला प्रचंड तप्त सुस्कारा
या तुझ्य़ा सार्;य़ा मलुल जिंदगीचा
या उन्मादाचा हा अर्थ कसा?
प्रिये..
मी मान्य करतो माझा अस्वस्थपणा
आणि स्वीकारतोही
तुझ्य़ा तगमगत्या मनाची चिंतातुरता
तुला हवे आहे
माझ्य़ा मुद्रेवरच्या भल्यामोठ्या प्रश्नचिन्हाचे
एक वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण
म्ह्णुनच;
काहीश्य़ा हाताशतेने तुझ्य़ासमोर मांडतो
त्या प्रश्नचिन्हाची एक वस्तुनिष्ठ कैफ़ियत...
"तुलाही कबुल असेल
या जिंदगिवरची माझी अपेक्षा
या अपेक्षेच्या पुर्तीसाठी पायदळी तुडविलेल्या
दाही दिशा
न तगमगता स्थिर राहुन
विजयी पहाटॆच्या स्वागताची केलेली मी
अखंड प्रतिक्षा
देशोधडीच्या कित्येक कथा पुराणॆ ऎकुनही
न उन्मळ्ता केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि
गांधींमार्गावरुन कित्येक कार्यालयाचे ठोठावलेले दारे
पण;
त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणॆच मलाही डावलले प्रत्येकाने
आणि स्वीकारले ज्यांच्या खिशातच केवळ
गांधी निवासीत होते
प्रिये..
तेव्हाच हारलो मी
माझ्य़ाच प्रामाणिक तत्वज्ञानाने
तेव्हा तु माझ्य़ा शॊकांतिकेवर ढाळलेले अक्ष्रु
आजही मला भासतात
माझ्य़ा देहावर टाकलेले तु अक्ष्रुफ़ुले...

वैभव देशमुख २३८

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jun 2014 - 1:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे नक्की काय आहे? कविता/मुक्तक/लेख/धडा? आणि हे हिंदी आहे की मराठी?

vaibhav deshmukh's picture

24 Jun 2014 - 2:06 pm | vaibhav deshmukh

एक मुक्त कविता..
जिच्यात मला शब्दापेक्षा अनुभव,
व्याकरणापेक्षा आशय आणि
भाषेपेक्षा भावना महत्वाच्या वाटतात.
धन्यवाद सर!

सस्नेह's picture

24 Jun 2014 - 1:52 pm | सस्नेह

हा मुक्त पद्य लेख असावा...

vaibhav deshmukh's picture

24 Jun 2014 - 2:18 pm | vaibhav deshmukh

कदाचित....पण कविता नक्की आहे.