गोवंशाला अभय द्या...!!
बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!
शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!
- गंगाधर मुटे ‘अभय’
---------------------------------------------------------
प्रतिक्रिया
3 Feb 2015 - 7:49 am | चुकलामाकला
मर्मभेदी!
4 Feb 2015 - 2:33 am | पिवळा डांबिस
सर्वच कविता सुरेख पण त्यातही,
जबाब नही!!
5 Feb 2015 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा
++++११११
5 Feb 2015 - 11:27 pm | हाडक्या
दसपट नाही तरी तेवढीच किंमत द्यावी गाई आणि बैलांनापण. तेवढे देखील पुरे.
4 Feb 2015 - 2:42 am | संदीप डांगे
विचार फारच चांगला आणि वेगळा..
5 Feb 2015 - 3:46 pm | गणेशा
सुंदर
5 Feb 2015 - 4:03 pm | विशाल कुलकर्णी
पटलं :)
6 Feb 2015 - 8:04 pm | बोका-ए-आझम
आता समजलं! उद्या माणसं भाकड झाल्यावर त्यांना कुठल्या कसाबाकडे नेणार ते पण सांगा!
8 Feb 2015 - 12:03 am | गंगाधर मुटे
काही भाकड माणसांना सरकारी तिजोरीतून पेन्शन वगैरे असते. गायींना केव्हा पेन्शन लागू करणार ते आधी सांगा! ;)
9 Feb 2015 - 9:46 am | थॉर माणूस
एक नंबर... :D
8 Feb 2015 - 12:29 pm | शैलेन्द्र
मी काय म्हणतो, जो न्याय गाईला तोच कोंबडी- बकराला व पाना-फळांना व झाडांनाही का नसावा?
संवर्धन हे झालच पाहिजे..
8 Feb 2015 - 12:31 pm | शैलेन्द्र
आपलच नाही, या गडबडीत गाईच लेकरुही उपाशीच मरत साल..
24 Mar 2015 - 2:35 pm | खंडेराव
आवडली..
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
हे बेस्टच