कॉफ़ी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
16 Feb 2015 - 10:30 pm

कॉफ़ीत एक नशा असते...
ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने.. अनुभवायची असते..
नशा काही कॉफ़ीची नसते..
ती सोबतिच्या भावनेची असते..

एकटेपणातही नशेची company असते...
ती कधी खोल गर्तेत नेते..
दुकटेपणात romance ची सोबत असते...
romantic नशेची धुंदी कॉफ़ीत असते...

मोजक्या गप्पा, business deals;
कॉफ़ी च्या टेबलावरची अनेक thrills...
गरमा-गरम गप्पांची वाफाळती कॉफ़ी,
हळुवार नजरांची बर्फाळती कॉफ़ी

प्रेमाच्या आणा-भाका; कुटुंबांची बैठक
कॉफ़ी च्या टेबलाची अशीही एक रौनक
सोबत कॉफ़ीची वाट पहातानाची....
खूप कामानंतरच्या निवांत क्षणाची!

कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति?
कळत-नकळत झाली आपल्यात sink ती...
टपरीच्या चहाची इज्जत भारी
पण कॉफ़ी च्या टेबलाने आणली नजाकत न्यारी
---------

कविता

प्रतिक्रिया

खूप छान कविता करता हो तुम्ही.

गवि's picture

16 Feb 2015 - 11:11 pm | गवि

..सहमत..

.कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति?
कळत-नकळत झाली आपल्यात sink ती..

..हे तर अल्टिमेट..

अल्टिमेटशी तीव्र सहमत _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2015 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा

@खूप छान कविता करता हो तुम्ही. >>> खरच!

गणेशा's picture

16 Feb 2015 - 11:45 pm | गणेशा

कॉफीमय कविता .. आवडली ..

अवांतर : आम्ही मात्र चहावरतीच आयुष्य सांधले

पदकि's picture

17 Feb 2015 - 3:55 am | पदकि

मस्तच!

पद्मश्री चित्रे's picture

17 Feb 2015 - 5:17 pm | पद्मश्री चित्रे

छान कविता आहे.

वर ४ मान्यवरांनी सर्टिफिकट दिल्यावर खरं तर मी अधिक काय लिवणार ?
..इत्केच बोल्ते की, कवयित्रीची काॅफी-काव्य-कल्पकता आणि काव्यातून कस केलेला करूण-क्लांत क्लिष्ट कर्माशय पाहून केवळ स्तिमित झाले आहे +)

पैसा's picture

18 Feb 2015 - 9:54 am | पैसा

ओ ताई/काका, तुमच्या डायरीला किती पानं आहेत?

अवांतरः तुम्हाला काळी कडवट कॉफी आवडते का पुणेरी बासुंदीसारखी?

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 10:06 am | पिवळा डांबिस

कॉफीची नशा येते तुम्हाला.
आयला, भाग्यवान तुम्ही!!!

मला बुवा तुमच्या लेखनाची नशा येते!!
अजून भरभरून येऊ द्यात!!

खटपट्या's picture

18 Feb 2015 - 10:25 am | खटपट्या

सुंदर