आग

अवतार's picture
अवतार in जे न देखे रवी...
8 Mar 2015 - 9:35 pm

एकटाच बसलो होतो
सागरी किनारयावरती
आकाशी नक्षत्रांच्या
मिणमिणत्या अंधुक ज्योती

फेसाळत येई किनारी
चंद्राच्या ओढीने जी
प्रत्येक लाट ती माझ्या
अंत:करणातील होती

ठेचाळत जरी आली
नदी सागरास भेटाया
परी तिला मिळाली पहिली
ती साद कोणती होती

माझ्या कवितेची झाली
ही शुष्क कोरडी पाने
जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती

कविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2015 - 10:25 pm | अत्रुप्त आत्मा

@जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती >>> __/\__

चुकलामाकला's picture

8 Mar 2015 - 10:45 pm | चुकलामाकला

रचना आवडली.

ज्योति अळवणी's picture

9 Mar 2015 - 9:19 am | ज्योति अळवणी

फेसाळत येई किनारी
चंद्राच्या ओढीने जी
प्रत्येक लाट ती माझ्या
अंत:करणातील होती

शब्द मनाला भिड़तात

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 9:31 am | श्रीरंग_जोशी

या कवितेत जान आहे.

प्रचेतस's picture

9 Mar 2015 - 9:33 am | प्रचेतस

सुरेख.

एक एकटा एकटाच's picture

9 Mar 2015 - 12:33 pm | एक एकटा एकटाच

माझ्या कवितेची झाली
ही शुष्क कोरडी पाने
जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती

मस्त......

अवतार's picture

9 Mar 2015 - 8:58 pm | अवतार

सर्वांचे आभार

चित्रगुप्त's picture

12 Jul 2023 - 6:18 pm | चित्रगुप्त

माझ्या कवितेची झाली
ही शुष्क कोरडी पाने
जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती
-- यापूर्वीच्या 'मांद्यपर्वातील भैरवी' या कवितेला हतोत्साहित करणारे सरजींचे प्रतिसाद, हीच ती 'आग' होती का ?