आग
एकटाच बसलो होतो
सागरी किनारयावरती
आकाशी नक्षत्रांच्या
मिणमिणत्या अंधुक ज्योती
फेसाळत येई किनारी
चंद्राच्या ओढीने जी
प्रत्येक लाट ती माझ्या
अंत:करणातील होती
ठेचाळत जरी आली
नदी सागरास भेटाया
परी तिला मिळाली पहिली
ती साद कोणती होती
माझ्या कवितेची झाली
ही शुष्क कोरडी पाने
जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती
@जाळून तिला जी गेली
रचना आवडली.
फेसाळत येई किनारी
जान आहे
सुरेख.
वाह!!!!!!
धन्यवाद !
ती आग 'ही' होती ?