मी ही निळा रंग निळा रंगांच्या जातं कुळा
स्वयमेवा-रंग कधी खेळलो न मि ही खुळा
स्वप्नांचा रंग नवा दिसवे तो बहु बरवा
रंगुनीही जाइ त्यात दिसला तो आत्म खुळा
रंगांचे देश नवे काय त्यात दिसत हवे?
तो हिरवा हा पिवळा त्यातचि मी एक निळा
रंगांनी काय दिले ? दालन ते बहुत खुले
शिरूनी मग आत त्यात हो तू ही बहुत-बळा
त्या गावी एकटाच नसतो कुणि सावळाच
असला जरी कुणिही तसा तो असतो बहु विरळा
रंगांची पंचमीच असते ती नित्य नवी
त्यात दिवस-जोडताच असते ती बहुत हवी
परी त्याच्या पाठून तू पाहि काहि दिव्य कळा
धरिती कुणी एकट्यास लडबडती त्यास खास
आवडते काही त्यास ? पुसत कोण नाही खुळा
खरे रंग खर्या कळा स्नेहांच्या जात कुळा
माणंसासी भेटंताच मानव्या रंग-जुळा
हौद तो ही रिकामाच कुठलेही रंग त्यात?
रंगण्यासी सर्वांन्ना असतो तो एक खुला
आलो या जगंदेशी कितीक रंग खेळूनी मी?
जाताना काय दिले? फक्त मला जाळुनि मी?
टाकुनिया वस्त्र जुने रंगण्यासी फिरुन पळा...
होता तो एक निळा...,कृष्ण(?)कोणी म्हणती त्यास!
नव्हताही रंग तसा त्याचाही त्यात खास
राधेच्या परि नावे शाश्वत तो मिसंळलंला
मी ही निळा रंग निळा,रंगांच्या बहुत कळा...
मि ही निळा रंग निळा...मि ही निळा रंग निळा...मि ही निळा रंग निळा...
===================================================
इथे ऐका
http://mfi.re/listen/b0aur9o0aw40b1s/me_hee_nila_ranga_nila_gayan.mp3
=====================≈==============================
प्रतिक्रिया
11 Mar 2015 - 12:18 pm | स्पंदना
संवेदना, अनुभुती घालुनिया गळ्यात गळा
नाचती रंगुनी हृदयी आत्मुच्या पाहूनी कळा
कितीक काव्ये, रचनांची रसाळ फळे
पिकविती वाग्डंमय मळा
झळझळती झळ झळा
आत्मुच्या शब्दकळा
:)
11 Mar 2015 - 1:41 pm | चुकलामाकला
वा वा ! सुंदर ! प्रदीप कुलकर्णी यान्ची ही कविता आठवली .
मज श्यामसुंदरा, तुझा लागला रंग !
गोरेपण गेले निळसर झाले अंग !
11 Mar 2015 - 2:47 pm | कहर
निळ्या नभाचे निळे किनारे
निळ्या जलाची निळसर खळखळ
मला संदीप खरेंचे आठवले बेला शेंडेंच्या आवाजातले
11 Mar 2015 - 2:49 pm | सूड
कविता लयीत म्हणता आली असती तर आणखी छान झाली असती. पहिल्या ओळीइतकी दुसरी ओळ लयीत म्हणता येत नाहीये.
11 Mar 2015 - 2:57 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त.....बुवांच्या या कविते मुळे कधितरी खरडलेले हे आठवले
हा निळा मोठा खट्याळ आहे. तो सगळीकडे आहे तरी तो कुठेच नाही. समोर दिसतो पण हाती गवसत नाही. हिरव्यागार वनराईत तो लपला आहे आणि वनराईच्या काठावर असलेल्या सरोवरात देखील. आकाशातुन तो अलगद डोंगराच्या माथ्यावर उगम पावणार्या निर्झरात झिरपतो. तिथुन वहात वहात सरोवरात येतो. आणि मग जमिनीत आणि तिकडून झाडांच्या पाना पानात तो सळसळतो.
वसंताचे आगमन होताच निळ्याशार आभाळाच्या चादरीवर गर्द पिवळ्या उन्हाच्या रंगांने वेलबुट्टी काढता काढता झाडे स्वतः कधि हिरवी होतात ते त्यांचे त्यांनाच समजतच नाही.
कधिकधि झाडांवर निळा लटकेच रुसतो. पण वेड्या झाडांना ते समजतच नाही आणि मग गर्द हिरवी झाडे निळ्याच्या अठवणीत झुरत पिवळी पडतात.
या निळ्याची निळाई देखील मोठी नवलाईची असते.
एखाद्या उंच डोंगरावर, जमिनीवर पडून, आकाशाकडे तोंड करुन, त्याचा निरभ्र निळा रंग कधी न्यहाळला आहे? त्याचा ठाव घ्यायचा कधी प्रयत्न केला आहे? पट्टीचा पोहणारा जसा सुर मारतो तसा सुर मारत स्वतःला झोकून द्यायचे त्या निळाई कडे आणि आकाशाच्या घनदाट, उबदार मिठीत स्वतःला विसरुन जायचे. त्या अथांग निळाईचा एक हिस्सा बनून जायचे. आपले तन मन धन त्या अथांग निळाईच्या स्पर्षाने निळेभोर होउन जाते. चित्तवृत्ती उल्हासीत होतात आणि मग मन कारंजे त्या निळ्या कडेच झेपावत सुटते. यावेळी त्याच्या मागे कितीही धावले तरी तो काही केल्या आपल्याला गवसत नाही. मग परत दमून मूगून परत आभाळाकडे डोळे लाउन पडून रहायचे. काही वेळाने आपली समजूत काढायला तो खट्याळ निळा परत येतोच.
हा शिवणापाणीचा अनुभव मोठा विलक्षण असतो. या खेळात जिंकतोही तोच आणि हरतोही तोच. त्याचे जिंकणे मान्य करत आपण मात्र आनंदाच्या निळ्याशार सागरात मस्त डुंबून घ्यायचे.
पैजारबुवा,
11 Mar 2015 - 3:05 pm | पॉइंट ब्लँक
यमक जुळवत - ही कविता नाद खुळा!
11 Mar 2015 - 3:15 pm | नाखु
मालक !
11 Mar 2015 - 9:49 pm | पॉइंट ब्लँक
"नाद खुळा" हा आयडी आहे हे लक्षात आलं नाहि.
11 Mar 2015 - 3:42 pm | सस्नेह
छानच आहे कविता. पण अनुस्वार मायंदाळ झालेत.
बाकी, ही वाचून आमच्या चच्याच्या 'फळ्या'ची याद आली.
11 Mar 2015 - 3:43 pm | सूड
मी हेच म्हणणार होतो, पण नेहमी काय आपणच खुस्पट काढायचं म्हणून गप्प बसलो. ;)
11 Mar 2015 - 4:23 pm | सस्नेह
मी खुस्पट नाय हां काढलं !
11 Mar 2015 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा
@मी खुस्पट नाय हां काढलं ! >>> अहो स्नेहाताई ..तुम्ही नाहिच काढलेलं, आणि तुम्हि काढणारंही नाही. ;)
असो.... मला सकाळी त्या वरच्या राधाकृष्णाच्या फोटोमुळे मनात एक लय धरली गेली ,आणि पहिली ओळ आली...नंतर पुढे हे सर्व नॉनस्टॉप आले...त्यामुळे त्याच लयीत लिहित गेलो... आता ते जमेल तसे गुणगुणून इकडे मांडलय. तेंव्हा प्लीज तिकडे जाऊन ऐका.. आणि मग पुन्हा एकदा करा परिक्षण ,कसे काय बरे वाइट ते! प्ली......................ज!
==================
आणि हो... हीच क्लिप वर धाग्यात लावून द्या...त्या राधाकृष्णाच्या फोटोसह...प्लीज. :)
http://mfi.re/listen/b0aur9o0aw40b1s/me_hee_nila_ranga_nila_gayan.mp3
11 Mar 2015 - 4:20 pm | प्रचेतस
लै भारी कविता
11 Mar 2015 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा
थांकु फॉर धागा अपडेट! :)
13 Mar 2015 - 8:49 pm | कंजूस
कसं काय जमतं एका निळ्या रंगावर एवढी कविता करायला ?भावाकलन कुवत नसल्याने आणखी प्रश्न नाही विचारत.गप्प."मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी"-कोण बरं म्हणालं?
13 Mar 2015 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा
@"मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी" >> चहापित्या हाताला रुळते जशी बशी! =))
14 Mar 2015 - 12:26 am | सूड
ही अशी यमकं काय चचा पण जुळवतो हो!! =))))
14 Mar 2015 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा
ऑ... अच वय! :P बलं... बलं.... बलं....! ;-)
14 Mar 2015 - 3:56 pm | विजुभाऊ
जय भीम
जय अर्जून
14 Mar 2015 - 9:00 pm | एस
कृष्ण खरंच निळा होता का हो? म्हणजे निळ्या रंगाच्या एकाही मानवाला पाहिले नसल्याने प्रश्न पडला आहे. कृष्ण निळा, कर्ण सोनेरी... मज्जा आहे एकूण.