माय...

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
10 May 2015 - 9:46 am

माई माय माई माय
नाई शिकली लेयनं
रातं दिसं मेहनतं
जीवं मातीले जायनं

चुरुक भुरुक अशी
लावे झाकटीतं रई
देते पाह्यटीचं मले
खायाले सायीचं दई

ठूनं हातावरं डोकसं
तिचं वगारु पाजनं
शाळेतलया पोराईचं
येकं दोनं आईकनं

चुनं भाकरं थापूनं
घाई घाई वावरातं
बोंड येचता येचता
जोळे नख़याईशी नातं

सोसूनं सासरवासं
तरी हाये समाधानी
पोरं शिकतीलं लयं
सदा राये ह्याच ध्यानी

दुधं तापऊनं राती
टाके तयातं ईरजनं
होते दई लोनी चं ते
नाई नासलं आजुन

कविता

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

10 May 2015 - 12:50 pm | पगला गजोधर

:)

ऊध्दव गावंडे's picture

10 May 2015 - 10:34 pm | ऊध्दव गावंडे

STU

सतिश गावडे's picture

10 May 2015 - 1:03 pm | सतिश गावडे

छान कविता.
ही बोलीभाषा कोणती?

ऊध्दव गावंडे's picture

10 May 2015 - 10:42 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !
ही वर्हाडी बोलीभाषा
विदर्भातील प्रामुख्याने अकोला,अमरावती बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यात बोलली जाणारी .

नूतन सावंत's picture

10 May 2015 - 1:25 pm | नूतन सावंत

_/\_

ऊध्दव गावंडे's picture

10 May 2015 - 10:47 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !

चुकलामाकला's picture

10 May 2015 - 6:54 pm | चुकलामाकला

भाव पोचला, आवडला. पण कही शब्दांचा अर्थ कळला नाही.
चुरुक भुरुक अशी
लावे झाकटीतं रई
तिचं वगारु पाजनं
म्हणजे?

ऊध्दव गावंडे's picture

10 May 2015 - 11:10 pm | ऊध्दव गावंडे

चुरुक भुरुक/_ मातीच्या मडक्यात किंवा मोठया पिपात रवी ला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने फिरवीत असताना त्या मडक्यात किंवा पिपात जो आवाज येतो वा जी एक विशिष्ट प्रकार ची लय निर्माण होते ती.

झाकटीत/- भल्या पहाटे

वगारू/- म्हशी चे तान्हे बाळ (she buffelow)
त्या वगारुला ताक पाजणे.

कविता अणि भाषा दोन्ही आवडले...

ऊध्दव गावंडे's picture

15 May 2015 - 4:52 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !