कविता

प्राजक्त

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
9 Jul 2015 - 2:42 pm

आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे,
गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे.

एव्हाना जगलो एकटाच,
सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे.

आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात,
घरास थोड़े घरपण मिळू दे.

बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची,
आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे.

-जिप्सी

कविता

भंगलेले अभंग शशिचे

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जे न देखे रवी...
9 Jul 2015 - 9:25 am

फेसबुकी रंगे
पोस्टच्या संगे
लाईक कमेंट
रेलचेल !!

फोटोंच्या डोळा
लोक होती गोळा
अन मुक्ताफळा
उधळती !!

एकटेच यावे
गुज पोस्टावे
लाईक ठोकावे
इतरांना !!

परी काय सांगू
नशीब हे पंगू
कोणी भिंतीवर
फिरकेना !!

पाहुनीया वाट
लागलीय वाट
अधिक काहीही
बोलवेना !!

शशि म्हणे देवा
ऐसा मित्र ठेवा
आम्हांला सदा
अप्राप्य

- जय जय फेसबुक समर्थ

अनर्थशास्त्रअभंगमांडणीकलाकवितामुक्तकविडंबनभाषाविनोदसमाज

मिपासार

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
8 Jul 2015 - 2:42 pm

(मिपावर)

जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !)

जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …)

जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! )

तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ?

तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ?

तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ?

अनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीमराठीचे श्लोकभयानकहास्यशांतरसवावरधर्मकविताविडंबनरेखाटन

कळी

सनईचौघडा's picture
सनईचौघडा in जे न देखे रवी...
8 Jul 2015 - 12:32 pm

अबला की सबला ,
वयस्क की बाला ,
नारी की कुमारी,
ऑफिस, शाळा की पाळणाघरी,
फुलायच्या आधीच कोमजली कळी ,
त्यांची नजरच विखारी ,

काळी की गोरी,
शिकलेली की भोळी,
मोलकरीण की अधिकारी ,
फुलायच्या आधीच कोमजली कळी,
सावज हेरणारे हे अट्टल शिकारी,

साडी असो की जीन्स
तोकडे कपडे की पदडाशीन,
गर्दीच्या बाजारी,की सुनसान आळी,
फुलायच्या आधीच कोमजली कळी ,
कायमची जखम ती जिव्हारी .

करुणमांडणीकविता

डोळे

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
7 Jul 2015 - 5:03 pm

प्रेरणा
" डॅा अहिरराव यांची मेंदू

जे नको ते नेमके का पाहती डोळे
अन सनी सिंहिणीला न्याहाळती डोळे

बंद कर पारायणे गीताकुराणाची
सांग सविता भाभीला का चाळती डोळे ,..

दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणासवे नाते बरे धुंडाळती डोळे

भेटला होता कधीकाळी जिथे बाप
आजही त्या थेटराला टाळती डोळे

तू जरा आता नवी होऊन ये भार्ये
त्याच त्या रुपास हे कंटाळती डोळे

जीवघेणे तू असे हासू नये राणी
दात किडक्या चेहऱ्या ना भाळती डोळे

gajhalकविता

माझं बाळ

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
7 Jul 2015 - 1:08 pm

माझं बाळ अगदीच लहान आहे;
अजून कड सुध्दा बदलता येत नाही त्याला.
ठेवलं तिथे ते पडून राहतं.
भूक लागली कि रडतं; पोट भरलं कि झोपतं,
झोपून झालं कि त्याच्या अबोध नजरेने टुकुर टुकुर कुठेतरी बघत राहतं.
आत्ता कुठे त्याला वस्तू आणि माणसं यांच्यातला फरक कळू लागला आहे.
अगदीच अजाण आहे माझं बाळ. अगदीच निष्पाप.
दुनियादारीचा, चांगल्या-वाईटाचा, कश्शाकशाचा त्याला गंध नाही.
कशा प्रकारच्या जगात तो आलेला आहे हेही त्याला ठाऊक नाही.
आणि या कोवळ्या मनाच्या कोऱ्या पानावर लिहिण्याची,
त्याच्यावर संस्कार करण्याची,

कविता

फक्त बडवे रोखण्याला

सटक's picture
सटक in जे न देखे रवी...
7 Jul 2015 - 1:09 am

वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे
गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !!

राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे
एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !!

तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे
वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !!

नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा
गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !!

लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे
फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !!

मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला
कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!

विठ्ठलकविता

बारिश की मेमरी

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
3 Jul 2015 - 11:08 am

बारिश की मेमरी भी बड़ी अजीब होती
पत्तो को हरा कर देती है, इंसान को सुखा ।
खैर वो छोड़ो
खिड़की से बाहर हाथ निकालकर देखा है कभी,
वोही बारिश अपने पन का भी एहसास देती है ।
तुम्हे याद है 'सखी' वो बारिश का दिन जब हम दोनों हाथ में सैंडल लिए,
नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे ।
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो ।
वैसे तो एक अर्सा गुजर गया है इस बात को पर आज भी वो दिन याद से गया नहीं ।
वो एक दिन था, और आज एक दिन है
उस वक़्त हम साथ होने के सपने बुनते थे,
आज सपने सच हो के साथ है ।

कविता

पुन्हा पाऊस

सटक's picture
सटक in जे न देखे रवी...
2 Jul 2015 - 7:27 pm

आला आला रे पाऊस, असे असे बरसले
अधीरल्या धरतीचे, लाजू लाजू पाणी झाले !

अंगप्रत्यंगी थरार, गात्रे ओथंबू वाहाती
एका रात्री असे झाले, काय सांगू तुल किती !

किलकिले डोळे होतं, वाटे थांबल्यासारखे...
आळसल्या त्या सकाळी, देता आळोखे पिळोखे !

हाय! परतुनी आला, पुन्हा रत अविरत..
सुखांताने अंधारून, देई आकाश संगत !

धुंद धरा धुंद पाऊ, माग कुणालाच नाही
उद्या सकाळी परंतु, वर येई नवलाई !

तरारून येता कोंब, पहा झुलतात झुले
मीलनाच्या एकांताला, येती हिरवाळी फुले !

शृंगारकविता

असं काहीतरी...

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
2 Jul 2015 - 1:40 pm

अवघडच आहे हे वळण,
चालवतही नाही आणि थांबवतही नाही..
झालंय असं काहीतरी.
वेळ काढणंच चालू आहे सध्या,
शेवटचाच आहे हा प्रवास नाहीतरी.

कणाकणाने मी झालीच आहे जीर्ण,
टाकवतही नाही आणि ठेववतही नाही..
झालंय असं काहीतरी.
मोडलंस एकदाच तर बरं होईल,
तुझी मुळं आता पसरलीत नाहीतरी.

तू यावस म्हणून रेंगाळलेय दारात,
बंद करवतही नाही आणि उघडतही नाही..
झालंय असं काहीतरी.
तोही सोपस्कार करून जा,
मनाची दारं बंदच आहेत नाहीतरी.

कविता