अबला की सबला ,
वयस्क की बाला ,
नारी की कुमारी,
ऑफिस, शाळा की पाळणाघरी,
फुलायच्या आधीच कोमजली कळी ,
त्यांची नजरच विखारी ,
काळी की गोरी,
शिकलेली की भोळी,
मोलकरीण की अधिकारी ,
फुलायच्या आधीच कोमजली कळी,
सावज हेरणारे हे अट्टल शिकारी,
साडी असो की जीन्स
तोकडे कपडे की पदडाशीन,
गर्दीच्या बाजारी,की सुनसान आळी,
फुलायच्या आधीच कोमजली कळी ,
कायमची जखम ती जिव्हारी .
बोचर्या नजरा समाजाच्या
येवु कशी माघारी?
विसर म्हणता विसरु कशी,
कशी घेवु नवी भरारी?
अन् भय इथलं संपत नाही
"निर्भया " म्हंटलत तरी
* आणि ह्या ओळी पालकांना सांगुन सुध्दा ते मुलीकडे लक्ष देत नाहीत त्यांच्यासाठी....
आभाळाचा केला कागद ,
आणि सागराची केली शाई ,
बाबा तुला किती लिहलं तरी ,
तु आलाच नाही.
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 12:36 pm | रातराणी
: (
13 Jul 2015 - 1:23 am | ज्योति अळवणी
हम्
13 Jul 2015 - 4:11 am | यशोधरा
:(
4 Aug 2015 - 2:35 pm | नाखु
आणि चटका दोन्ही एकाचवेळी !!!