कविता

आठवन

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
22 Aug 2015 - 5:53 pm

सुरु होऊदे अबोल गोष्टी
पुन्हा येऊदे जुना शहारा
हळू चोरट्या नजरे मागुन
पुन्हा करावा कुणी पहारा

पुन्हा येऊदे रात्र बिलोरी
स्वप्नाला जी साद घालते
पुन्हा वाटूदे शणास मजला
कुणी पाहूनी मला भाळते

पुन्हा हाथ या हाथि यावा
पुन्हा साथीने रात्र सरावी
कुणी मिटोनि हळूच डोळे
मुक्या मिठिची आस धरावि

कविता

सुखी जग

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
22 Aug 2015 - 12:25 am

याहूनी सुखी जग ते कोणते?
भेटल्याचा आनंद नाही
निरोपाचा खेद नाही....
आभासी जगातला फिल कसा
गुड गुड व्हेरी गुड!

आठवणींचे सेल्फी कुठले?
हसल्याचा आवाज नाही
मुसमुसल्याचा गंध नाही......
आभासी जगातला टच कसा
साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट!

कोण जागतो कोणासाठी?
फिकट डोळे दिसत नाहीत
उरली रात्र सरत नाही....
आभासी जगातला गुंता कसा
क्रेझी क्रेझी काचणारा!

भावकविताकरुणकवितातंत्र

मन

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जे न देखे रवी...
21 Aug 2015 - 11:10 am

मन
मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग
मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग

मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता
त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता

मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले
किती शोधले तरी, न एक डोळा दिसले

मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता
डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता

मन कणखर किती , सावटाची दाटे भीती
सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती

मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ
मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ

कविता

अनाहत

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
21 Aug 2015 - 7:13 am

साकळली पावसाळी रात्र
गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ
ऐकूनी तो अनाहत नाद
गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़

पाचोळा नीजलेला शांत
येई दचकून त्याला जाग
शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस
मंत्रोच्चारात लावी आग

घुबडांचे थांबले घुत्कार
छपराला टांगले वाघूळ
माळावरच्या कुबट कोषात
निर्वाताची व्यथा गाभूळ

घाबरला वळचणीचा जीव
सैरावैरा पळे फडताळ
केविलवाणे दडे ते बीळ
काळोखाला चरे विक्राळ

पागोळ्यांच्या भिडे हृदयास
भिजलेला आर्त अंतर्नाद
कातर सूरात देती हाक
देणारा ना कुणी प्रतिसाद

कविता

अस्तित्वकण

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 4:00 pm

बरेच ब्राम्हवृंद,
घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत...

बरेच मराठे,
चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत...

उर्वरित महाराष्ट्र
'आम्हाला काही घेणं देणं नाही'
या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय...

"अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर
"वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय...

उभे केलेले कारखाने बंद पाडून
तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब
मोठमोठे मोर्चे काढ़तायत...

कवितामुक्तकसमाजkathaaराजकारणविचारलेखमत

घर एकटे बागेसह......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Aug 2015 - 4:40 pm

घर एकटे बागेसह ...........
घर एकटे बागेसह वाट श्रावणाची पाहते,
एकेक झाडमाड अंतरीचे गुज येथे सांगते.

पुसट लाल संकासूर बोलतो न काही
उचलूनी फांद्या परी आकाशाकडे पाहतो
कोण आले, कोण गेले, राहिले न कोणी
तरी दाराशी स्तब्धसा, वाट कुणाची पाहतो?

सरताना बहर तसा, कळ्या दोन हासल्या
'मोगराच मी सुगंधी, जरा अजून बहरतो
पावसाची वाट पाहण्या, कळ्यांतून झुरतो
श्रावणाची झड येता, मी पानांतून मिटतो!'

भावकविताकविता

14 ऑगस्ट

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Aug 2015 - 8:02 am

"वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा"

आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे.

कसे उमजले नाही मला
आज झालो मी 82 वर्षाचा
असेल मन माझे रेंगाळत
समजूनी मला 28 वर्षाचा

भूक,तहान अन इच्छा आकांक्षा
अजूनी आहेत जशाच्या तश्या
वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा

कवितामाहिती

होती एक नजर.......

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
13 Aug 2015 - 6:01 pm

होती एक नजर.......
मला पाहणारी
लाख झिडकारले तरी
अंगचटीस येणारी.....

होती एक नजर.......
मला शोधणारी
कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप
तर कधी खिडकीवर रेंगाळणारी

होती एक नजर.......
मला आसुसलेली
प्रत्येक नकाराने माझ्या
सुडाने ठसठसलेली...........

होती एक नजर.......
मला दाहणारी
पेटवून देहास माझ्या
खुनशी खदखदणारी..........

होती हर एक नजर....
माझ्यावरच खिळलेली
जेव्हा फोडला मी टाहो
तेव्हा हलकेच चुकचुकलेली.....

कविता

असमाधानाची

अर्थहीन's picture
अर्थहीन in जे न देखे रवी...
13 Aug 2015 - 10:06 am

एक भरलेली 'शव'वाहिका
एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते
.........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी??

पानसरेंच्या छातीतली गोळी
दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते,
..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती.

नेमाडेंच्या दौतीतली शाई
कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते
.........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी???

कलामांची मुठमाती
याकूबच्या मुठमातीला म्हणते
.........मला कालच 'पालवी' फुटली,
तू अजुन कोरडीच कशी??

शांतरसकविता

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
12 Aug 2015 - 9:56 pm

दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात....

हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों.

बालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनआस्वाद