आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
12 Aug 2015 - 9:56 pm

दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात....

हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों.

ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान. परंपरेचे मला ज्ञान, संगीताची मीच आहे राणी, पंचम सूर हा ऐका माझा, कुह कुह कुह कुह.

ह: ह: ह: ह:, जुनाट बूर्ज्वा सूर तुझा, आज जमाना रेपचा, पुरोगामी या कावळ्याचा, रेप रेप रेप रेप, कांव कांव कांव कांव.
कोण बूर्ज्वा, तू हलकट, नालायक, चुडेल-डाकिन तू, कुह कुह, कांव कांव. म्याऊ म्याऊ, भों भों भों, हातवारेचा हा! हा! हा!.

ज्वलंत चर्चा रंगली अशी, कान लाउनी ऐकती सारी, ज्ञानी अज्ञानी प्रतीगामी, ऐकू आले केवळ, ढेन्चू, ढेन्चू, ढेन्चू गर्दभ गान.
आजची चर्चा इथेच संपली, आपण उद्या पुन्हा भेटू, नवीन विषय पण ओरड तीच, ढेन्चू, ढेन्चू ढेन्चू.

कुणाला काही कळले का? नसेल तर उद्या पहा ‘आजची ज्वलंत चर्चा’

बालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

12 Aug 2015 - 10:47 pm | राघवेंद्र

आवडले आहे.

पैसा's picture

13 Aug 2015 - 1:07 pm | पैसा

आजची ज्वलंत चर्चा! =))

विवेकपटाईत's picture

13 Aug 2015 - 10:05 pm | विवेकपटाईत

हातवार्यांची लोकप्रियता कमी झाली वाटते.

कंजूस's picture

14 Aug 2015 - 3:36 am | कंजूस

पोपट होता सभापती ------
उद्यापर्यंत थांबणे आले.

स्पंदना's picture

14 Aug 2015 - 7:25 am | स्पंदना

नुसत्या घोषणा!
वर आणि हाताने खाणा-खुणा, अजून ओरडा!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 7:36 am | अत्रुप्त आत्मा

बगळे काकांचा विजय असो.

चौथा कोनाडा's picture

14 Aug 2015 - 12:11 pm | चौथा कोनाडा

सही ! ! !