कुठे भटकशी वरुणराजा!
आकाश झाले कोरडे,
सुकले त्याचेही नरडे,
कुठे भटकशी वरूणराजा,
पाऊस इथे का न पडे.
धरतीची दशा ही सुन्न,
दाही दिशाही खिन्न,
कुठे भटकशी वरूणराजा,
कधी होशील तु प्रसन्न.
तुझ्या आगमनाची आस,
शेते पडली ही ओस,
कुठे भटकशी वरूणराजा,
घेऊदे मोकळा श्वास.
भिजवुन टाक ही अवनी,
आनंद पसरी या भवनी,
दया करा हो वरूणराजा,
भिक मागतो तुझ्या मी चरणी.
---- हृषीकेश ----