कविता

तुकारामा-

शशीभूषण_देशपाण्डे's picture
शशीभूषण_देशपाण्डे in जे न देखे रवी...
23 Sep 2015 - 9:15 pm

तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते?
-तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते?

नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता
तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता

कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस?
पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस

टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता..
कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता?

माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते!
नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते!

चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली...
एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली...

कविता माझीभावकवितामुक्त कविताकविता

|| सांगा आता आम्ही काय करायचं? ||

नितिन५८८'s picture
नितिन५८८ in जे न देखे रवी...
23 Sep 2015 - 11:57 am

कॉलेजला जाण्यासाठी बस stop वर तीन बस ची वाट बघत थांबायचं,
थोड्याच अंतरावर आम्ही नुस्त तिच्याकड बघत थांबायचं.
बस आल्यावर तीन पटकन बस मधी चढायच,
तिच्याकड बघण्याच्या नादात आम्ही आपल सगळ्यात शेवटी बस मधी चढायच.
आता मुलगी असल्या मुळ तिला बसायला जागा कुणीपण द्यायचं,
आम्हाला आपल उभच रहाव लागायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

कविता माझीकविता

पापड कर वा पोळ्या लाट (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
22 Sep 2015 - 6:50 pm

आमची पेर्ना

रस्सा तिखट पुरी सपाट
तरी न माझे भरले ताट...

जिलबीमागून भजी वाढली
बासुंदीचा भलता थाट..

वरणभाताच्या शिखरांमध्ये
तुपाचा हा अवघड घाट..

जरा किनारा दिसला पानी
मठ्ठ्याची मग आली लाट...

आयुष्याच्या पंगतीस मी ..
पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

आरोग्यदायी पाककृतीकविता

..पापड कर वा पोळ्या लाट..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
22 Sep 2015 - 12:34 pm

रस्ता सरळ भुमी सपाट
तरीही माझी चुकते वाट...

पंगतीमागुन पंगत उठली..
मेल्यानंतर भलता थाट..

दो मृत्युंच्या शिखरांमध्ये
आयुष्याचा अवघड घाट..

जरा किनारा दिसला आणि
लाटेमागुन आली लाट...

आयुष्याचे पीठ मळवले..
पापड कर वा पोळ्या लाट.. !!!!!

- योगेश

कविता

चुलीमध्ये घाल

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
22 Sep 2015 - 9:44 am

चुलीमध्ये घाल

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

या मातीचा लोळ एकदा क्षितिजे भेदुनी मार
चिंब न्हाऊ दे दिगंताला रंग दे लालीलाल

अभय-गझलवाङ्मयकवितागझल

अंबाडा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Sep 2015 - 8:45 pm

अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?

प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?

दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?

ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?

अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?

- संदीप चांदणे

कविता माझीभावकविताकविताप्रेमकाव्य

तुला मी आठवतो का गं?

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
19 Sep 2015 - 9:19 am

आजही जेव्हा
स्वप्नांत तुझ्या....
रात्र रंगुनी जाते,
एकएकट्या नभात तुझ्या
अनोळखी रंग भरुनी जाते,
दूर लुकलुकणाऱ्या चांदण्यात
मग स्वत:ला हरवताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?

आजही जेव्हा
येण्याने तुझ्या....
आसमंत मोहरून येतो,
नुसत्या चाहुलीने तुझ्या
अलवार गंधाळुन जातो,
धुंद मदहोशणाऱ्या निशिगंधात
मग स्वत:ला विरघळवताना
तू खरं खरं सांग
तुला मी आठवतो का गं?

कविता

..... तो कृष्ण 'एकटा' होता !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
18 Sep 2015 - 10:32 am

कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा
वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला
गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग
हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग
पण वृन्दावनचा राणा
..... तो कृष्ण 'एकटा' होता !

चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा
चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला
ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या
अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया
विश्व डोलते ज्या मुरलीवर..
...... तो कृष्ण 'एकटा' होता !

शांतरसकविता

< नैराश्याकडे फाऊले>

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
17 Sep 2015 - 9:33 am

पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन
(मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 )

उत्साह आला, संचारला संचारला,
लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला,
कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले.
सर्वां जसे नवपाखरु मिळाले.
पण आता …
भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले,
छटाकभर पिंक मिळेनासे झाले.
आज जरी धाग्यांना पंख लागले.
अखेरची जिलबी प्रसवुन झाले,
तरी डुआय पण न फिरकले,
हीच का नैराश्याकडे फाऊले?

काहीच्या काही कविताकविताविडंबन

हे काय कमी काय?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Sep 2015 - 9:46 pm

उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

कविता माझीभावकवितामुक्त कवितासांत्वनाकरुणकवितासाहित्यिकजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर