कविता

लाघवी

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Sep 2015 - 12:31 pm

तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!

अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही,
वारंवार सावरायला लागली आहेस तू...
डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल
तू काही बोलत नाहीस...
ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य...
त्या बंद ओठाआड मात्र,
कधी पोहोचताच येत नाही बघ...
सगळं आर्त ...
त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू !

आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !

विशाल...

करुणशांतरसकविता

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
12 Sep 2015 - 12:24 am

कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली
काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला

न पळी राहिलीए ना पंचपात्र
किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे
रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच
त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे
संपत आलेल्या किणकीणाटाला
खणखणाट समजून अथवा भासवून
उगाच खडे फोडतात कधी कधी
शिळ्याकढीला ऊत आणून
कधी सत्तेच्या आशेने
कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या
मृगजळी स्वप्नाने
कधी कामधेनू आपल्याही
गोठ्यातून निघून गेली या दु:खाने

अभय-काव्यकविता माझीकाणकोणकालगंगाकॉकटेल रेसिपीप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितास्वरकाफियावीररसकवितामुक्तकविडंबन

किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Sep 2015 - 12:15 am

किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!

उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!

आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!

प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!

अनर्थशास्त्रकविता माझीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनावावरसंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

शब्द !!!

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 5:40 pm

शब्द !!!

शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला
म्हणजे, त्रास नाही हा देत, मनात घोटाळत राहतात
कधी एकदाचे, मनाच्या कोऱ्या पाटीवरून, अलगद उतरून
एक अर्थपूर्ण गोफ गुंफतात , असे होवून जाते

कधी ,कधी अगदीच निरर्थक पणे
बाहेर पडायला धडपडत असतात
सांगितले तरी ऐकतच नाहीत
मग काय, वायफळ गप्पा होतात
त्यांचाशी माझ्या, अगदी शिळोप्याच्या

कधी कधी, हवे असतात न
चपखल बसणारे शब्द, तेव्हा मात्र
दडी मारून बसतात, जणू
लपाछपिचा खेळ खेळतात

कविता

ग्रेस . . (श्रद्धांजली - दि.२८ मार्च २०१२)

एस.योगी's picture
एस.योगी in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 12:23 pm

"प्रिय ग्रेस . . . . ."
दुःखाचा महाकवी होतास 'तू'
दुःख साजरे करायला
शिकवलस तू मला..
व्यथा अन वेदनांनाच जगण्याची भाषा केलीस तू
देवालाही ठावूक नसेल कुठल्या मातीचा बनला होतास तू,
काळजातल्या दुःखाला सहसा कुणीही हात लावत नाही
अन तुला मात्र काळजातल्या दुःखाशिवाय कधी काहीच रुचलं नाही..
दुःखाला तरल करायला सहजच जमायचं तुला
दुःखातही 'सुख' असते हे तुझ्यामुळेच कळले मला,
सुखालाही दुखावेल इतक्या सुंदरपणे तू दुःख साजरं करायचास
अन तितक्याच अभिमानाने ते जगासमोर मिरवायचासही…..
पण तू एक प्रमाद केलास.................

कविता माझीकविता

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 10:10 am

स्कार्फ आडून चमकती डोळे
खुणवून काही बोलताती
मनी आमुच्या काही पक्षी
हलकेच हळूच उडताती

तरंग येतात मनी मग
जोवर ती असते पुढे
स्वप्न-रंजनाचा पारवा
ऊंsssच आकाशी उडे

ओढणि ती सँक ती ही
डोकावे वॉटर बॉटली
सुंदर किती रूप हे
भावना मनात साठली

हॉर्न मागून वाजताही
किल killले तो आरसा
निबरल्या आमुच्या मनी
फरक न पडे फारसा! ;-)

सिग्नलाला थांबताहि
खेळ तोची राहे सुरु
सुटता सिग्नल मागूनी
ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\

अभंगआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडशृंगारवीररससंस्कृतीकविताबालगीतऔषधोपचारगुंतवणूकमौजमजा

माणूस

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 5:52 am

बराच अवधि गेल्यावर्ती
हर्ष मनी दाटला
हरवलेला माणूस पुन्हा
रस्त्यावरती भेटला

कसलीही ना चाहुल देता
पाठलाग त्याचा केला
थोड़े अंतर राखून तेव्हा
नवा प्रवास झाला

भुकेलेल्या जिवास पाहून
पानी डोळ्यात दाटल
होत न्हवत शिदोरितल
सार त्याने वाटल

हतबल उभ्या रस्त्यालगत
अंधाकड़े पाहता
पळत जाऊन पुसल त्याने
सांग कुठे राहता?

दमून भागून शेवटी बसता
रोजच्या गाडीत जाऊन
वृद्ध दिसले उभे कुणी
उठला जागा देऊन

मुक्त कविताकविता

तू ग

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 12:16 am

समर्थ असूनही अबला तू
सबल मनाची कोमला तू

नभोवनीचा शीतल चंद्र
अन्... तप्त सूर्याची आभा तू

मनमोकळा निर्झर तू ग
हृदयस्थ गंभीर डोह ही तू

स्वर गंगेचे आरोह कधी तू
कधी दबलेली आर्तता तू

सर्वात असूनही.. एकटीच तू ग
तुझ्या मनीचा आधार तू

भावकविताकविता

प्रणयपंचमी

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 12:05 am

हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...

विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..

प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी ,
झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी ,
धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी

निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी,
परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी,
सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी..

(या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )

भावकविताकविता

चूक नाही

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
8 Sep 2015 - 2:15 pm

जरी सुखाची आस असणे चूक नाही
हाव आहे ही आता, ही भूक नाही

ओरडूनी सांग अथवा बस कुढत
तेच आहे सत्य की जे मूक नाही

बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर
जातीची तुझियाकडे बंदूक नाही

आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा
एक बिक होणे मुळी ठाऊक नाही

कारणाविण काही येथे होत नाही
अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही

वाटते ते हो करूनी मोकळा तू
धाकधूक नाही आणि रुखरुख नाही

शेवटी पैसाच देतो चार घास
भावनांनी भागणारी भूक नाही

आरशाला दोष देणे चूक आहे
आरशावर प्रेम करणे चूक नाही

मराठी गझलकवितागझल