प्रतिसाद, वाद वगैरे....
साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका
नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका…
अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता
मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ?
कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा
ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ?
नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी
बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का?
सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे
सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का?