ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 10:10 am

स्कार्फ आडून चमकती डोळे
खुणवून काही बोलताती
मनी आमुच्या काही पक्षी
हलकेच हळूच उडताती

तरंग येतात मनी मग
जोवर ती असते पुढे
स्वप्न-रंजनाचा पारवा
ऊंsssच आकाशी उडे

ओढणि ती सँक ती ही
डोकावे वॉटर बॉटली
सुंदर किती रूप हे
भावना मनात साठली

हॉर्न मागून वाजताही
किल killले तो आरसा
निबरल्या आमुच्या मनी
फरक न पडे फारसा! ;-)

सिग्नलाला थांबताहि
खेळ तोची राहे सुरु
सुटता सिग्नल मागूनी
ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\

ग्रीन सिग्नलाची वाट
पाहू नये रे का मना?
होतात की हो तुम्ही ही त्यात
फक्त एकदा, "नाही" म्हणा!

हाय याहि विचारात
गेली ती निघुनी पुढे
पुन्हा दुसय्रा स्कार्फ साठि
मन आमुचे बागडे

रस्त्या वरच्या ट्रेफ़िकात
सुखाची ही झुळूक आहे
एरवी कं'टाळून आंम्हा
मरण येथे अटळ आहे

पीरेम नव्हे हे फ़क्त ही
सुखाची तर भावना
सिग्नल चुकला तर होते
केवळ ती ही वासना

जाऊ दे ते तत्त्व आणि
ज्ञान माझे तोकडे
मी ही जातो मार्गी माझ्या
जा तुम्ही तुमच्याकडे
===========
सध्या एव्हढेच.. ;-) बाकी चे .. पुन्हा कधीतरी! :-D

अभंगआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडशृंगारवीररससंस्कृतीकविताबालगीतऔषधोपचारगुंतवणूकमौजमजा

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Sep 2015 - 10:17 am | माम्लेदारचा पन्खा

ही गाडी बुंगाट सुटली आहे बर्का ....णो शिगनल !!

एस's picture

10 Sep 2015 - 10:35 am | एस

तो 'सँक' शब्द फारच भावला. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2015 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

ते नुस्त अर्धचंद्र बोंबल्या च्या कळ फलकावर उपलब्ध नाय हो! :-\

दू दू दू! :-\

एस's picture

10 Sep 2015 - 1:13 pm | एस

sEk असे टाईप करा सरळ. सॅक असे देवनागरीत उमटेल.

सूड's picture

10 Sep 2015 - 2:34 pm | सूड

+१

सँक वाचून आय टोटली सँक!! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2015 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

बुवा, असं काही करू नका. जिमो तुमच्यावर प्रताधिकारभंगाचा खटला भरतील ना ;) :)

चाणक्य's picture

10 Sep 2015 - 10:41 am | चाणक्य

जमलीये. 'भावना'पोचल्या.

नाखु's picture

10 Sep 2015 - 10:44 am | नाखु

सकाळचे दहा वाजून ४० मिनिटे झालीत ऐकूयात

दो रास्ते मधील हे सुमधूर गीत.

नुस्तालोजीया नाखु

प्रचेतस's picture

10 Sep 2015 - 10:45 am | प्रचेतस

अतिशय अप्रतिम, सहज सुंदर कविता.
दैनंदिन जीवनात सतत दिसत असणाऱ्या प्रसंगाचे अतिशय काव्यमय भाषेत भावविभोर वर्णन.
ह्या सुंदर काव्यामुळे आम्ही कर्जदार झालोत तुमचे.

आम्हाला तुमच्या लेखनाच्या चाहत्यांमधे एक स्थाण दया प्लीज.

अन्या दातार's picture

10 Sep 2015 - 3:14 pm | अन्या दातार

अत्यंत सहमत. कसं सुचतं हो तुम्हाला बुवा??

नाव आडनाव's picture

10 Sep 2015 - 10:58 am | नाव आडनाव

स्कार्फ आडून चमकती डोळे
कालंच अरेबिक म्युजिक सर्च करून ऐकत होतो. असे बरेच "स्कार्फ आडून चमकणारे डोळे" होते :)
ही घ्या लिंक त्या डोळ्यांची :) https://www.youtube.com/watch?v=H0kNHLXAQMo

सस्नेह's picture

10 Sep 2015 - 10:58 am | सस्नेह

अजून कुठल्या स्कार्फमध्ये अडकला नाहीत ना ?

पद्मावति's picture

10 Sep 2015 - 11:05 am | पद्मावति

मस्तं. मजेदार लिहिलय.

मला काही कड्वी नाही समजलीत :( बुवासाठी स्थळ पहा आता :प

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2015 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

@मला काही कड्वी नाही समजलीत :( >> कसं ते!? :-D

@ बुवासाठी स्थळ पहा आता : >> दुत्त जिल्बुचा! :-\ ब्वार! ;-)

स्रुजा's picture

11 Sep 2015 - 12:10 am | स्रुजा

या बुवा लायनीत .. अखिल मिपा वधुवर सुचक मंडळात स्वागत आहे तुमचं. वधु ने स्कार्फ बांधुन च कांदा पोहे प्रोग्राम ला यावं ही वि.सु. तुमच्या फायलीत टाकते. पियुशा तुला रेफरल चा काही बोनस मिळणार नाही ये, सगळी फी भरायचीच !

बाकी कविता लय भारी. मजा आली वाचताना.

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 1:09 pm | प्यारे१

रेवती आज्जी नी नवीन पार्टनरशिप सुरु केली का तुमच्याशी?

दा विन्ची's picture

10 Sep 2015 - 11:26 am | दा विन्ची

मस्तं. मजेदार लिहिलय.

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 12:43 pm | प्यारे१

मस्त ओ बुवा.

थोडीशी भाऊसाहेब पाटणकरांची याद आली. नै नै वयामुळं नै, कवितेतल्या निरागस चावटपणामुळे ;)

पैसा's picture

10 Sep 2015 - 12:59 pm | पैसा

=)) पुणे तिथे काय उणे!

मामोआॅ शिव शिव शिव, आत्मुस शोभत नाही हो तुला, श्रावण चालू आहे हे विसरू नकोस हो.
हे विचारत होते, तुझ्या फटफटीवर ह्यांना डबलसीट बसायला मिळेल काय?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2015 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा

हे नको! :-\ तु ये! ;-) मग शोभेल.. बर का, The मामी! :P

बॅटमॅन's picture

10 Sep 2015 - 5:33 pm | बॅटमॅन

तू ये तुला डबल(शीट) नेईन? ;)

बाकी कविता क्लासच! नाव आडनाव यांनी म्हटल्याप्रमाणे अरबी नेत्रपल्लवी हा एक वेगळाच प्रकार आहे.

दमामि's picture

10 Sep 2015 - 5:40 pm | दमामि

मामोअॅा
इश्श, चावट कुठला. हे काय वय आहे का माझं?

भैड्या's picture

10 Sep 2015 - 9:46 pm | भैड्या

हा द मामी आहे की द मामा?
आम्ही तर मिरासदारच समजत होतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 8:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बुवा मांडी घालुन बसतात म्हणे गाडीवर. डबलसीटचा जरा घोळ होईल रे.

चाणक्य's picture

10 Sep 2015 - 1:53 pm | चाणक्य

बाकी ते 'स्कार्प' असं न लिहील्याबद्दल निषेध

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 2:21 pm | प्यारे१

याक्चुअलि त्याला 'स्टोल' म्हणतात.
बुवा बाल्पणापासून अविवाहीत असल्यानं (चाणाक्ष वाचकांनी आम्ही ब्रह्मचारी म्हटलं नाही हे ओळखलं असेल्च) त्यांना म्हायती नाही. ;)
-माहितगार (आयडी नव्हे)

बाबा योगिराज's picture

10 Sep 2015 - 2:06 pm | बाबा योगिराज

खासच.....

स्कार्फ के पीछे कभी भागना नही चाहीये. एक गया तो दुसरा आयेगा.

सूड's picture

10 Sep 2015 - 2:35 pm | सूड

अंमळ हिरवट कविता!! =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2015 - 3:20 pm | अत्रुप्त आत्मा

तितकाच खवट परतीसाद! ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2015 - 3:50 pm | अत्रुप्त आत्मा

@प्रचेतस
ह्या सुंदर काव्यामुळे आम्ही कर्जदार झालोत तुमचे. >> धन्य"वाद मारझन :P
आम्हाला तुमच्या लेखनाच्या चाहत्यांमधे एक स्थाण दया प्लीज.>> असो!
===============
@अन्या दा तार >> हल कट दू दू दू :-\ ल्लुल्लुल्लुल्लू :P
================
स्नेहा तै>> नै! :-D पळून गेले तीन स्कार्फ! :-D
===================
@प्यारे
बुवा बाल्पणापासून अविवाहीत असल्यानं>> :-D दुष्ट! :-D
=================

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 6:44 pm | प्यारे१

>>>> पळून गेले तीन स्कार्फ! :-D

काय बुवा? काय हे?

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2015 - 4:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

बुवांच्या पिवळट कविताही मस्त असतात

अर्थात हे देखिल आवडलीच

पैजारबुवा,

पिचकू's picture

10 Sep 2015 - 5:17 pm | पिचकू

अले वा !अश्श आहे का?

अन्या दातार's picture

10 Sep 2015 - 6:41 pm | अन्या दातार

असं नव्हे ते.

अच्चं जालं तल असं म्हणायच असतय :)

कधितरी झालं तल "अच्च जाल्ल तल"
नेहमीच होतंय तल "अश्श आहे तल"

नैवो, हे अगदीच पिचकल्यासारखं वाटतयं.

मी-सौरभ's picture

10 Sep 2015 - 5:28 pm | मी-सौरभ

सिग्नलाला थांबताहि
खेळ तोची राहे सुरु
सुटता सिग्नल मागूनी
ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\

हे तेवढ जरा ईस्कटून सांगा ना गडे!!

सूड's picture

10 Sep 2015 - 5:38 pm | सूड

अग दी!!

मागून सिग्नल सुटणे हा कवीने मराठी भाषेला दिलेला नवा वाक्प्रचार वाटतोय. यावर वाचायला आवडेल.

भैड्या's picture

10 Sep 2015 - 9:40 pm | भैड्या

@ मी -सौरभ, ते असे आहे.
सिग्नलला थांबल्यावर तोच खेळ सुरू राहतो.
सिग्नल सुटल्यावर व थोडं पुढे गेल्यावर पाठीमागुन लोकं ओरडतात , " अरे नको मरू".

- (आर. टी. ओ. महासंचालक) भैड्या

अजया's picture

10 Sep 2015 - 8:58 pm | अजया

भावविभोर कविता!

मांत्रिक's picture

10 Sep 2015 - 10:07 pm | मांत्रिक

बुवा मस्त आहे हो जिल्बी! अगदी अवखळ! थोडी चाबरट! पण मस्त जिल्बी!!!

च्यायला एकपण सणसणीत प्रतिसाद नाही?
गद्यपद्यविडंबनकृतीमंचास जाहिर आव्हान.कोणरे तो बोल्ला विडंबनास पेर्णा देणारं येतच नाही?

शंतनु _०३१'s picture

11 Sep 2015 - 1:07 pm | शंतनु _०३१

Office हुन परततानाची माझीच "कैफियत" मांडली हो नेमक्या शब्दात

रेवती's picture

12 Sep 2015 - 3:05 am | रेवती

कित्ती तरल भावना या!

एक एकटा एकटाच's picture

12 Sep 2015 - 7:08 am | एक एकटा एकटाच

मस्त मजा आली
वाचुन

अभ्या..'s picture

12 Sep 2015 - 2:17 pm | अभ्या..

अहाहाहा,
काय ती प्रतिभा. अप्रतिम.
गुर्जी तुमची चाहत्यांची यादी प्रचेतसरावाणंटर खुली असेल तर मला पन स्थाण द्या णा.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2015 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

त्या हत्तीला मी बुदकवणार आहे..... :-/ दुत्त दुत! ल्लुल्लुल्लुल्लु :-/

बुदकवताना आधीच सांगा गुरुजी. मला त्या एतिहासिक प्रसंगाचे मजनूभाय स्टैल पेंटींग करायचे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2015 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2015 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

जेपी's picture

12 Sep 2015 - 3:18 pm | जेपी

पन्नास.