चूक नाही

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
8 Sep 2015 - 2:15 pm

जरी सुखाची आस असणे चूक नाही
हाव आहे ही आता, ही भूक नाही

ओरडूनी सांग अथवा बस कुढत
तेच आहे सत्य की जे मूक नाही

बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर
जातीची तुझियाकडे बंदूक नाही

आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा
एक बिक होणे मुळी ठाऊक नाही

कारणाविण काही येथे होत नाही
अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही

वाटते ते हो करूनी मोकळा तू
धाकधूक नाही आणि रुखरुख नाही

शेवटी पैसाच देतो चार घास
भावनांनी भागणारी भूक नाही

आरशाला दोष देणे चूक आहे
आरशावर प्रेम करणे चूक नाही

एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना
यापरी माझी अपूर्व चूक नाही

- अपूर्व ओक
ब्लॉग दुवा हा

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

दमामि's picture

8 Sep 2015 - 2:47 pm | दमामि

वा! सुंदर!

द-बाहुबली's picture

8 Sep 2015 - 4:21 pm | द-बाहुबली

हम्म... न चा पाढा. छान जमलाय.

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 5:07 pm | विशाल कुलकर्णी

मस्त ..

वेल्लाभट's picture

10 Sep 2015 - 4:13 pm | वेल्लाभट

धन्यवाद

निनाव's picture

11 Sep 2015 - 6:35 pm | निनाव

वाह. अप्रतिम.

\\
आरशाला दोष देणे चूक आहे
आरशावर प्रेम करणे चूक नाही \\

सटक's picture

11 Sep 2015 - 6:38 pm | सटक

मस्त..

पैसा's picture

11 Sep 2015 - 6:50 pm | पैसा

कविता आवडली.

सस्नेह's picture

11 Sep 2015 - 8:05 pm | सस्नेह

सुरेख !
कविता की गझल ?

मांत्रिक's picture

11 Sep 2015 - 8:38 pm | मांत्रिक

शेवटी पैसाच देतो चार घास
भावनांनी भागणारी भूक नाही

कविताही सुंदर! वरील ओळी तर खूप अर्थपूर्ण! वैश्विक सत्यच!!!