कविता

चारचा चहा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 8:43 pm

चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!

चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!

चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

आरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनासंस्कृतीकविताप्रेमकाव्यमुक्तकसमाजजीवनमानदेशांतर

ती

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 8:37 pm

ती धरित्री ती जीवन दायिनी
ती शक्ती ती भक्ती

ती विद्या ती प्रज्ञा
ती अर्धागिनी, ती कन्या

ती वीज , ती नीज
ती काळजी , ती प्रीत

ती प्रेरणा , ती ज्योत
ती ममता, मायेच स्त्रोत

ती हळवी, अन तरी ती खंबीर हि
ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि

तीची ओंजळ नेहमी रिक्त,
तीचे जगणे कधी मनमुक्त

ती पावसची रिमझिम बरसणारी धारा
अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा

ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली
तरी स्वत्व स्वताचे जपलेली

कविता

भुकेल वासरू

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 11:09 am

माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,

लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं
घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं..

मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही
दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही..

नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही,
गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही..

थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं,
पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं..

डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,

करुणकविता

क्रूड ऑईल...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 9:35 pm

झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव

रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड

आरोग्यदायी पाककृतीहास्यकरुणसंस्कृतीकवितासमाज

..अळणी..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 8:31 pm

..अळणी..

तसं माझं आयुष्य असं काही खास नाही..
घेतलेल्यांपैकी अनेकात चुकलेला एकही श्वास नाही..

दिवस येतो दिवस जाते..रेंगाळणारी रात नाही..
किती बोललो तरी देखील..आठवणारी बात नाही...

ओळखीचे तसे बरेच जण..कुणाशी दोस्ती ..वैर नाही..
कधी देतो कधी घेतो..पण वागणे मुळीच स्वैर नाही...

आभाळ तसं निरभ्रच कधी जमतात काही ढग..
उगा उगा हळवं वाटत तेव्हा मात्र सारं जग..
अगदीच भुरभुर बरसतो...कुठे कोसळणारा मेघ नाही..
संथ वाहणारं पाणी सारं..त्याला कुठे आवेग नाही...

कविता

ठिकऱ्या

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 8:18 pm

रात्री रस्त्यावर चालताना
समुद्र माझ्या ओंजळीत लपला.
उथळ पाण्यात चंद्र ढगाआडून खोल हसला.
काळवंडलेली विवरं अनंतात रुतत गेली.
आकर्षकणाची साखळी सहस्त्रकांत गोल फिरली.

हलकेच तरंग उठले आणि चांदण्या बेभान झाल्या.
ऊधानलेल्या समुद्रात सहर्ष हेलकावत खिदळत राहिल्या.
कुठुनसा एक किरण लाजत लाजत चालुन आला
अविरक्त अवकाशात फाटत फरफटत पुढे गेला

मुक्त कविताकविता

एकाकी

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 6:50 am

तिथे थांबतोय
जिथे थांबायचं न्हवत
ठरवलं होत
मागे वळून पहायचं न्हवत

ती अंधार खोली
पुन्हा उघडतोय
मोडलेल्या फडताळात
स्वताला शोधतोय

सोफ्यावरली धूळ झटकून
बसून क्षणभर डोळे मिटलेयत
क्षणभरातच त्यांनीसुद्धा
चुकांची चलचित्र पाहिलेयत

जगाच्या वेगासोबत धावताना
मागे खूप काही राहून गेलय
कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई
निरागस हसण विसरून गेलोय

चव यशाची मिळवायला
आजवर फक्त स्पर्धा केलीय
दिखाउपणाच्या गर्दीसाठी
आपल्यांची आहुती दिलीय

भावकविताकविता

माझे आकाश...

बन्या बापु's picture
बन्या बापु in जे न देखे रवी...
12 Oct 2015 - 11:07 am

(गुलझार यांच्या एका मुक्ताकावरून भारावून काहीबाही सुचलेले..)

शाळेतून येताना चिंचोक्या सोबत लपवला होता आकाशाचा एक तुकडा..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...

लाल हिरव्या तांबड्या लोलंकात हरावयाचा तो कधी.. कधी चोरकप्यात लपून बसायचा..
अंधारात चांदण्याचा प्रकाश शोधून देत असे मला.. माझा आकाशाचा तुकडा..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...

मुक्त कविताकविता

कविता

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जे न देखे रवी...
11 Oct 2015 - 9:46 pm

कविता
कविता लिहिणे अन कविता बनवणे
यात काय फरक असावा??
शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण
विचारसरणीतील 'नेमकेपणा' कुठून यावा !!

फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे
हेच कवितेचे यश आहे
पण त्या भावना नीट समजावून घेणे
हेच रसिक मनाचे लक्षण आहे

कुणी भावनांना महत्व देईल तर कुणी शब्दांना
वय आणि अनुभव यावर हे अवलंबून आहे
पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडतेच
वास्तविकतेत यालाच महत्व आहे

शब्द न शब्द जोडून
ओळ न ओळ बनेलहि
डोकं थोSSड वापरून यमक
पण जुळेलहि…………

कविता माझीकविता

उशीर फार झाला. .

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
11 Oct 2015 - 11:42 am

तुटली नाती या मनाने जोडलेली
जे सार्या नसानसांत भिनलेली
क्षणात विझुन गेली सारी स्वप्ने
तुझ्यासवे मी एकांतात पाहीलेली...
तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला
आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला...

मोठ्या मुश्किलीने स्वप्नाला छान रंग आलेला
बघता बघता त्या प्रेमातला गंध निघुन गेला
वेड्या मनाने जगण्याचा सुर नवा धरलेला
जगता जगता गाण्यातला आनंद निघुन गेला...
तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला
आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला...

कविता