तुटली नाती या मनाने जोडलेली
जे सार्या नसानसांत भिनलेली
क्षणात विझुन गेली सारी स्वप्ने
तुझ्यासवे मी एकांतात पाहीलेली...
तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला
आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला...
मोठ्या मुश्किलीने स्वप्नाला छान रंग आलेला
बघता बघता त्या प्रेमातला गंध निघुन गेला
वेड्या मनाने जगण्याचा सुर नवा धरलेला
जगता जगता गाण्यातला आनंद निघुन गेला...
तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला
आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला...
प्रेमज्योत पेटवायला उशिर फार झाला
वात जळण्याआधीच अंधकार फार झाला
पेटलेली ठिणगी हातीच विझुऩ गेली
पुन्हा पुन्हा विझण्याचा प्रकार फार झाला
तुटल्याने या मनाचा विश्वास विझुन गेला
आता प्रेम करण्याचा आस्वाद निधुन गेला...
नाव सुचले नाही. .
प्रतिक्रिया
11 Oct 2015 - 4:50 pm | तर्राट जोकर
पहिला महिना: अतीव, अनावर त्रास, हमसे का भूल हुइ जो ये सजा हमका मिली, बेकदरोसे करके प्यार...
दुसरा महिना: थोडा त्रासदायक मूड, जवळच्यांना आपली फसलेली प्रेमकथा ऐकवत पकवणॅ
तिसरा महिना: मजबूत खरेदी, नवे कपडे, जुन्या मित्रांना फोनाफानी.
चौथा महिना: अजून जुन्या आठवणींचे कढ. कारण नवीन काही हातात नाही.
पाचवा महिना: सवयी बदलल्या. जग बदललं. मन रुटीनमधे परत
सहावा महिना: मस्त बहारोंका मैं आशिक, मैं जो चाहे यार करू, चाहे गुलोंके सायेसे खेलु, चाहे कली से प्यार करू,... सारा जहा है मेरे लिये... मेरे लिये...