कविता

तिची कविता

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जे न देखे रवी...
31 Oct 2015 - 11:28 pm

ती एक आई जीवन घडवणारी!
ती एक पत्नीसाथ देणारी !!

ती एक ज्योती
उज्जवल भविष्याप्रत नेणारी!
ती एक दिप्ती
अखंड तेवत राहणारी !!

ती एक कळी
उमलण्यासाठी आसुसणारी!
ती एक चांदणी
चमचमण्यासाठी धडपडणारी !!

ती एक शक्ती सामर्थ्य प्रदान करणारी !
ती एक व्यक्ती
जगण्याचा अधिकार मागणारी!!
- निलम बुचडे.

कविता माझीकविता

हाक

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
31 Oct 2015 - 7:56 pm

हाकेसरशी धावून येणं
सदैव पाठीशी असणं
काहीच पुरेसं नव्हतं
मान्य

तुझ्या आर्त मूक हाका
ऐकू आल्या नाहीत
खोट्या हास्यामागचं
वेदनांनी होरपळलेलं मन
दिसू शकलं नाही
मान्य

तरीही इतकं सारं बिघडण्याआधी
स्वतःहून साद घालणं
फार कठीण होतं का?

-------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशितः
http://mandarvichar.blogspot.in/2015/10/blog-post_31.html

कविता माझीकविता

कौतुक

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
31 Oct 2015 - 11:14 am

माझा हात अलगद सोडवून
तू जायला निघतेस
उन्हं डोक्यावर येतात
सावल्या ...
फेर धरून गोळा होतात
माझ्याभोवती !
वेशीपाशी तू थबकतेस
मनमोर नाचायला लागतो
"सावली मागेच राहिली रे"
तू कसंबसं हसून सांगतेस
सावलीचा हात धरून
पुन्हा चालायला लागतेस
तिच्या पदराचा शेव...
माझ्या छातीपाशी अडकलेला
तू तशीच....
नेटाने चालत राहतेस
कशाचं कौतुक करू ?
तिच्या ओढीचं ...
किं...
तुझ्या नेटाचं .... ?

विशाल

भावकविताकविता

करवाचौथ आणी संकष्टी चतुर्थी

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
31 Oct 2015 - 10:14 am

आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी,
तू कशी दिसत होतीस गं ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???

DDLJ मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही...

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा.

आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो,
आणि
माझा 'संकष्टी चतुर्थी' चा.

जिप्सी

मुक्त कविताकविता

माझ्या मराठी मातीत

सायकलस्वार's picture
सायकलस्वार in जनातलं, मनातलं
31 Oct 2015 - 6:49 am

- या कवितेची प्रेरणा विशाल कुलकर्णी यांच्या 'माझ्या सोलापुरी मातीत' या कवितेवरून मिळाली, त्याबद्दल त्यांचे, आणि त्यांनी ज्यांच्या कवितेवरून प्रेरणा घेतली(!) त्या बोरकरांचेही आभार ;)
*******

माझ्या मराठी मातीत
पडे छाया आभाळाची
दरी-खोर्‍यांतून जाती
संथ पावले काळाची

माझ्या मराठी मातीत
येते गाज सागराची
गंध वाहे मोहराचा
हवा खारी आगराची

माझ्या मराठी मातीत
वाहे शांतरस साचा
समाधिस्थ आहे तीत
कुणी पोर संन्याशाचा

कविता

लाजाळू नि गुलाब

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
30 Oct 2015 - 5:11 pm

लाजाळूच्या झाडापुढे
गुलाबाच फूल नको
स्पर्शाविना मिटण्याची
त्याला नवी भूल नको!

गुलाबाच फूल भारी
लाजाळूला खेटलेल
लाजाळूच झाड वेड
येता जाता मिटलेल!

कुणी द्या रे रंग-वास
लाजाळूला मिरवाया
तोरा नवा दाखवून
ताटव्याला फुलवाया!

- संदीप चांदणे

कविता माझीप्रेम कविताशांतरसकविताप्रेमकाव्यमौजमजा

"माझ्या सोलापुरी मातीत..."

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
30 Oct 2015 - 11:04 am

कविवर्य बोरकरांची मनापासून क्षमा मागून...

आ. बाकिबाबांची मुळ कविता : माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या सोलापुरी मातीत
गड्या आभाळ कोरडे
वेशी-पेठांच्या मधुन
मराठी कन्नड़ चौघडे !!

माझ्या सोलापुरी मातीत
भाषा विविधेची रास
ओठी शिव्यांचे पाझर
मनी माणुसकीचा वास !!

मुक्त कविताकविता

फुल सांगे काट्याला ………

एकप्रवासी's picture
एकप्रवासी in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 9:53 pm

फुल सांगे काट्याला
किती आनंद देतो मी सगळ्यांना
माझ्या रूपाच, रंगाच अन सुगंधाच
किती ओढ साऱ्या जणांना

गोड गाण्यांत, केसांच्या वेणीत
किती गुंफतात मला
देवाच्या चरणाशी वाहण्याच
भाग्य मिळेल काय तुला?

थोडस हसून काटा बोलला फुलाला
मी असताना सहज कोण छेडील बरं तुला
एक काजळाचा ठिपका समज तू मला
लागो ना नजर कुणाची तुला

कुणाच्या चरणाशी वाहण्याच भाग्यं
कधी नाही मिळणार मला
ह्या कळ्याफुलाचं, वेलीपानाचं सौदर्य
पाहण्याचं भाग्य काय कमी आहे मला.

कविता

एक माणूस मिशी काढून..............

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 8:08 pm

एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!

हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!

इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....

कविता माझीप्रेम कविताभावकवितासांत्वनाकरुणकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजशिक्षण

।। बरे झाले स्वातंत्र्य मिळाले ।।

सचिन जाधव's picture
सचिन जाधव in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 2:34 pm

बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले
ते गोरे साले रस्त्यामध्ये
थूंकू देत नव्हते
वेड्यासारखे रोज पाण्याने...
रस्ते धूत होते.
आपण किती भाग्यवान
गुटका पान तंबाकू खाऊन
रस्त्यात कुठेही थूंकू शकतो.
छान झाले स्वातंत्र्य मिळाले
ते इंग्रज साले धान्यामध्ये
भेसळ करू देत नव्हते
मूर्खासारखे रेशनवर
सकस धान्य देत होते.
आपण किती पुण्यवान
दूध अन्न औषधामध्ये
बेमालूम भेसळ करू शकतो.
बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले
ते ब्रिटीश साले शिक्षणाचा
धंदा करू देत नव्हते अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण

कविता