भुकेल वासरू

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 11:09 am

माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,

लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं
घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं..

मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही
दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही..

नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही,
गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही..

थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं,
पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं..

डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,

.. माळरानी चालुन चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू खरचं जिवनाला मुकुन गेलं होतं..
   

करुणकविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

14 Oct 2015 - 1:19 pm | पद्मावति

आई..ग्ग..
कवीता वाचून अस्वस्थ व्हायला झालंय. प्रभावी लेखन.

वासराला कधी औताला जुंपलेलं पाहिलं नाही. गोर्‍ह्यालाही जास्त कष्टाची कामं लावत नसतात. औताला जुपतात ते बैलांना. तेव्हा कवितेत वापरलेली प्रतिमा चुकीची आहे. इथे शब्दशः अर्थ अपेक्षित नाही हे समजतेय, तरीही कवीने आपल्या काव्यातल्या वा लेखकाने लेखनातल्या प्रतिमा वापरताना जागरूक असायला हवे असे समीक्षेच्या दृष्टीने पहायला गेल्यास वाटते.

माहीराज's picture

14 Oct 2015 - 4:58 pm | माहीराज

मग बुवा तुम्हाला ही कविताच समजलेली दिसत नाही .

एस's picture

14 Oct 2015 - 10:45 pm | एस

बरोबर आहे. या कवितेची संक्षीस्टाईल चिरफाड करावी असं फार वाटलं. पण जाऊ द्या. तुम्हांला विधायक समीक्षा सहन होत नाही, ती कशी सहन होणार.

पुढच्या रतीबासाठी शुभेच्छा. अजून प्रतिसाद देऊन हा धागा वरती तरंगवत ठेवण्यात अर्थ नाही. चालू द्या.

माहीराज's picture

21 Oct 2015 - 7:49 pm | माहीराज

धन्यवाद

मांत्रिक's picture

21 Oct 2015 - 9:18 pm | मांत्रिक

लिहित रहा! प्रतिकात्मक आहे! कुणाला समजलं नसेल तर तुम्ही त्याला काय करणार? भावना पोहोचल्या!

मदनबाण's picture

14 Oct 2015 - 9:04 pm | मदनबाण

:(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र

मांत्रिक's picture

14 Oct 2015 - 9:49 pm | मांत्रिक

साध्या व सच्च्या शब्दांत लिहिलेली कविता!!! प्रतिकात्मक आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. व्यवहाराचे कठोर नियम लावले तर प्रत्येक साहित्यकृतीचा चिवडाच होईल.

जव्हेरगंज's picture

14 Oct 2015 - 9:53 pm | जव्हेरगंज

एक दोन ओळी सोडल्यास, क्लास!

ही कविता लिहीताना डोळ्यासमोर आजचा जीवनाला कंटाळेलेला शेतकरी होता...आता या भावनेतून ही कविता वाचा...

त्यातल्याच एका शेतकरर्याच्या मुलावर लिहिली आहे.

सौन्दर्य's picture

14 Oct 2015 - 11:10 pm | सौन्दर्य

खरं म्हणजे कवीला आपल्या कविते विषयी स्पष्टीकरण द्यावे लागू नये असे म्हणतात. काही प्रतिसादा नंतर तुम्ही ते दिलेत. परंतु ते स्पष्टीकरण वाचण्या आधी कविता वाचताना डोळ्यासमोर आली ती मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करणारी छोटी मुले. काही कळायचं आतच ती मुले पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, अस्तित्वासाठी संघर्ष करतात. नशीब जर चांगले असेल तर मोठं झाल्यावर ह्या संघर्षमय परिस्थितून बाहेर येऊन थोडी स्थिरावतात. परंतु असे चांगले नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही.

कविता अतिशय साधी, सोप्या शब्दात लिहिली आहे. अभिनंदन.

मांत्रिक's picture

14 Oct 2015 - 11:12 pm | मांत्रिक

उत्तम प्रतिसाद!!!

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 8:57 pm | प्यारे१

त्र - t+r+a

कविता पोचली.
आज एस भाउ वेगळ्या मूड मध्ये असावेत. ;)

ज्योति अळवणी's picture

21 Oct 2015 - 11:21 pm | ज्योति अळवणी

ओह... मन दुखलं...

अविनाशकुलकर्णी's picture

22 Oct 2015 - 12:03 am | अविनाशकुलकर्णी

कामगार पण असाच चेपला गेला..संपवला गेला..पण त्याने जिवन संपवले नाहि..संघर्ष केला